Kota Factory Season 3 Review : 'या' गोष्टींसाठी कोटा फॅक्टरी पाहाच!

मुंबई तक

ADVERTISEMENT

kota factory season 3 review jeeyu bhaiyas tilotama tome puneet batra pravin yadav manish chandwani nikita lalwani iit jee exam
कोटा फॅक्टरीचा हा भाग पाहण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
social share
google news

Kota Factory Season 3 Review : नेटफ्लिक्सवर सर्वाधिक लोकप्रिय सीरीजपैकी एक असलेल्या कोटा फॅक्टरीचा तिसरा सीझन रिलीज झाला आहे. त्यामुळे कोटा फॅक्टरीचा हा भाग पाहण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या सीझनमध्ये कोटामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या सीझनमध्ये विद्यार्थ्यांसोबत जितेंद्र कुमारदेखील स्ट्रगल करताना दाखवले आहेत. त्यामुळे या सीरीजमध्ये एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. (kota factory season 3 review jeeyu bhaiyas tilotama tome puneet batra pravin yadav manish chandwani nikita lalwani iit jee exam) 

ADVERTISEMENT

'कोटा फॅक्टरी' कोटा, राजस्थान येथे स्थापित आहे, जो IIT-JEE तयारीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध झाला आहे. या सीझनची स्टोरी  IIT इच्छुक वैभव (मयूर मोरे), बालमुकुंद मीना (रंजन राज) आणि उदय (आलम खान) यांच्याभोवती फिरते आणि त्यांचे भौतिकशास्त्र शिक्षक-सह-मार्गदर्शक जीतू भैय्या (जितेंद्र कुमार). 

हे ही वाचा : दानवेंनी दिली मोठी बातमी, कोअर कमिटीमध्ये निघाला मातोश्रीच्या 'त्या' बैठकीचा विषय

मीनल (उर्वी सिंग) ही दुसरी विद्यार्थिनी शोच्या सुरुवातीला म्हणते, जीतू भैया शैक्षणिक, गैर-शैक्षणिक, आर्थिक, रोमँटिक अशा विद्यार्थ्यांच्या सगळ्या समस्या सोडवतो. सीझन 3 मध्ये, जीतू भैय्या विद्यार्थ्यांसह या समीकरणाची पुनरावृत्ती करतो आणि वैभव, मीना, उदय हे त्यांच्या संयुक्त प्रवेश परिक्षेची तयारीची जबाबदारी घेतो. या सीझनमध्ये अभिनेत्री तिलोतमा शोम केमिस्ट्री टीचरच्या भूमिकेत दिसणार आहे तिचे नाव पूजा दीदी आहे.  

हे वाचलं का?

कोटा फॅक्टरीचा सीझन 2 हा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने संपला होता. विद्यार्थ्यांच्या या आत्महत्येने जीतू भैय्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यानंतर जीतू भैय्या विद्यार्थ्यांवर सर्वात जास्त सकारात्मक प्रभाव कसा पडू शकतो, याचा विचार करू लागतो. या सीझनमध्ये जीतू भैय्या फक्त शिकवत नाही आहे, तर लढाई लढत आहे, ती देखील स्वत:शीच. आता ही लढाई जीतू भैय्या जिंकतो का? हे पाहण्यासाठी तुम्हाला कोटा फॅक्टरीचा सीझन 3 पाहावा लागणार आहे. 

हे ही वाचा : Ravindra Waikar : "वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका", थेट लोकसभा महासचिवांना नोटीस

दरम्यान कोटा फॅक्टरीत शिक्षणाचा झालेला बाजार आणि विद्यार्थ्यांवर परिक्षेचा असलेला दबाव. आणि या दबावातून विद्यार्थ्यांमध्ये येणारे नैराश्य, या नैराश्यातून घडणाऱ्या आत्महत्या, अशा सगळ्या गोष्टी पडद्यावर मांडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्ट्रगलने भरलेली ही सीरीज आहे. ही सीरीज तुम्हाला हसवेल, रडवेल आणि एंटरटेन देखील करेल. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT