ना पाणी-ना वॉशरूम… एअरपोर्टवर अडकलेल्या राधिका आपटेसोबत घडलं तरी काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Radhika Apte Shared Instagram Post When She locked at airport with passengers for hours with no amenities
Radhika Apte Shared Instagram Post When She locked at airport with passengers for hours with no amenities
social share
google news

Radhika Apte : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) सोशल मीडियाद्वारे तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राधिका मोठ्या अडचणीत सापडली होती. तिने याबाबत एक पोस्ट शेअर करत सांगितले की, ती कित्येक तास विमानतळावर अडकली होती, तिथे ना पाणी होते, ना वॉशरूममध्ये जाण्यासाठी कोणतीही सुविधा होती. तिच्यासोबत लहान मुलांसह इतर अनेक प्रवासीही अडकले होते. (Radhika Apte Shared Instagram Post When She locked at airport with passengers for hours with no amenities)

राधिका विमानतळावर कशी उडकली?

राधिकाने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आणि त्या कालावधीतील संपूर्ण आपबीती सांगितली. तिचे फोटो आणि व्हिडीओही तिने शेअर केले आहेत. व्हिडीओमध्ये राधिकासोबत अनेक प्रवासी दिसत आहेत, ज्यात लहान मुले आणि वृद्ध लोक आहेत. प्रत्येकजण दरवाजाबाहेर बघत इथे काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. राधिकाने सांगितले की, जेव्हा तिने तिथे काय चालले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा एका महिला कर्मचाऱ्यांनी मूर्खपणाचे उत्तर दिले.

वाचा : Divya Pahuja: छिन्न-विच्छिन्न अवस्था… 11 दिवसानंतर कसा लागला मॉडेलच्या मृतदेहचा छडा?

राधिकाने लिहिले, ‘मला हे पोस्ट करावे लागले. आज माझी फ्लाइट सकाळी 8:30 वाजता होती, आता 10:50 झाले आहेत, मी फ्लाइट बोर्ड केले नाही. परंतु फ्लाइट डिटेल्समध्ये हे दर्शवलं जात आहे की आम्ही बोर्ड केलं आहे आणि प्रवाशांना एरोब्रिजमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि सर्वांना लॉक करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लहान मुले आणि वृद्धांसह प्रवासी एका तासापेक्षा जास्त काळ आत बंद आहेत आणि सुरक्षा दरवाजे उघडत नाही. कर्मचार्‍यांना काहीच सुगावा नाही. त्यांची टीम अद्याप फ्लाइटमध्ये चढलेली नाही. जुनी टीम बदलली आहे आणि ते अजूनही नवीन टीमची वाट पाहत आहेत पण ते कधी येतील ते माहीत नाही त्यामुळे किती वेळ ते आतमध्ये बंद असतील हे कोणालाच माहीत नाही.’

वाचा : Crime : नवी मुंबई हादरलं! बिल्डराला कार्यालयात घुसून संपवलं, नेमकं काय घडलं?

यासोबतच राधिकाने लिहिले, ‘मी बाहेरून एका अत्यंत मूर्ख कर्मचारी महिलेशी बोलून आले आहे. मला संधी मिळताच मी तिला विचारले की इथे काय चाललं आहे, ती म्हणाली, काहीच समस्या नाही आणि उशीरही झालेला नाही. आता आम्ही आतून बंदिस्त आहोत आणि त्यांनी आम्हाला सांगितले की, आम्ही किमान 12 वाजेपर्यंत इथे असू. सर्व बंद आहेत. पाणी नाही, वॉशरून नाही… या मजेशीर प्रवासाठी धन्यवाद!!’

ADVERTISEMENT

राधिकाच्या या पोस्टवर युजर्स कमेंट करत आहेत आणि सहानुभूतीही व्यक्त करत आहेत. ही पद्धत योग्य नसल्याचे अनेकांनी सांगितले. विमान कंपन्यांनी असे करू नये.

ADVERTISEMENT

वाचा : 4 मुलांचा बाप.. 5 मुलांच्या मेहुणीला घेऊन पळाला, पत्नीही पाचव्यांदा गरोदर…

राधिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच ती कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या मेरी ख्रिसमसमध्ये कॅमिओ करताना दिसली. याआधी तिचा मिसेस अंडरकव्हर ZEE5 वर रिलीज झाला होता. ज्याचे लोकांनी खूप कौतुक केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT