Salman Khan च्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं रायगड कनेक्शन!
Salman Khan House Firing Case : बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना रविवारी (14 मार्च) पहाटे 4.50 वाजता घडली. दोन अज्ञात आरोपींनी गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर 5 गोळ्या झाडत गोळीबार केला. या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.
ADVERTISEMENT

Salman Khan House Firing Case : बॉलिवूड (Bollywood) स्टार सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना रविवारी (14 मार्च) पहाटे 4.50 वाजता घडली. दोन अज्ञात आरोपींनी गॅलेक्सी अपार्टमेंट (Galaxy Appartment) बाहेर 5 गोळ्या झाडत गोळीबार केला. या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र, सलमान खानचे चाहते आणि कुटुंबीय या घटनेनंतर चिंतेत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी 15 पथके तयार करण्यात आली आहेत. (Raigad connection of the accused who fired bullets outside Salman Khan's galaxy Appartment in Bandra )
या प्रकरणासंबंधित आता नुकतीच एक अपडेट समोर आली आहे. CCTV फुटेजमध्ये सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करताना दिसलेल्या दोन आरोपींपैकी एक गुरुग्राम येथील असल्याचा संशय आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआरही नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, 'त्यांनी सलमानच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर एक मोटरसायकल जप्त केली आहे आणि ती हल्लेखोरांनी वापरली असल्याचा संशय आहे.'
गोळीबार करणाऱ्या आरोपींचं रायगड कनेक्शन?
माहितीनुसार, हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींनी रायगडमधून जुनी दुचाकी खरेदी केली होती. हीच जुनी दुचाकी घेऊन आरोपींनी सलमानच्या घरापर्यंत प्रवास केला होता. या दुचाकीची विक्री करणाऱ्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. गोळीबारानंतर मुंबईबाहेर पळून जाण्याचा त्यांचा पूर्वनियोजित प्लॅन होता. आरोपींनी या घटनेनंतर ट्रेनने प्रवास केल्याचीही माहिती आहे.
पोलीस अधिकारी या प्रकरणाबाबत काय म्हणाले?
वांद्रे पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध FIR नोंदवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहाटे 4.50 वाजता वांद्रे भागात असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर दोन व्यक्तींनी 5 गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला. या इमारतीत अभिनेता सलमान खान राहतो. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकृत सूत्राने सांगितले की, आरोपींपैकी एक गुरुग्रामचा असल्याचा संशय आहे, जो हरियाणातील अनेक खून आणि दरोड्याच्या प्रकरणात सामील आहे.