Salman Khan ने पुन्हा एकदा जिंकलं मन! कर्करोगाशी लढणाऱ्या चिमुकल्या चाहत्याचं केलं स्वप्न पूर्ण

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Salman Khan kept His Promise and met his 9 years old Fan Who was battling cancer Boosted his morale
Salman Khan kept His Promise and met his 9 years old Fan Who was battling cancer Boosted his morale
social share
google news

Salman Khan Met his 9 years old Fan Who was battling cancer :आपल्या 30 मिनिटांच्या भेटीत सलमान खानने (Salman Khan) एका चिमुकल्याला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. या चिमुकल्याचं नाव जगनबीर असून तो कर्करोगाशी झुंज लढत आहे. सलमानने जगनबीरला वचन दिलं होतं की, जर तो एका योद्ध्याप्रमारे कर्करोगाशी लढेल तर आपली भेट पुन्हा होईल. पाच वर्षानंतर दोघांनीही हे वचन पाळलं आणि त्यांची पुन्हा भेट झाली. (Salman Khan kept His Promise and met his 9 years old Fan Who was battling cancer Boosted his morale)

ADVERTISEMENT

काही मुलं लहान वयातच एवढी हिंमत आणि धैर्य दाखवतात की, मोठ्यांनाही ते शक्य नसतं. कठीण काळातही ते त्यांच्या एका स्माईलने संकटांचा धीटपणे सामना करतात. असेच काही लोकही असतात जे या मुलांना मदत करण्यासाठी पुढे येतात आणि त्यांचे सर्व दुःख दूर करतात. सलामान आणि जगनबीरमधला बॉन्डही असाच काहीसा आहे.

वाचा : Manoj Jarange : शिंदे सरकारची जरांगेंनी उडवली झोप! ‘या’ मागण्यांमुळे अडचण

जगनबीरसोबत नेमकं काय घडलं होतं?

2018 मध्ये, 4 वर्षाच्या जगनबीरला ट्यूमरचे निदान झाले होते. जगनबीर एवढ्या लहान वयातच भयंकर उपचारांना सामोरे जात होता. तसंच लहानपणापासूनच तो सलमान खानचा मोठा फॅन आहे. एक दिवस सलमान खानला भेटण्याचं जगनबीरचं स्वप्न होतं आणि त्याचं हे स्वप्न पूर्णही झालं.

हे वाचलं का?

वाचा : जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा, ‘सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज द्या नाहीतर उद्या…’

2018 मध्ये त्याच्यावर मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यावेळी जगनबीरची ट्यूमरमुळे दृष्टीही गेली होती. पण बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान जगनबीरपर्यंत पोहोचला. सलमान खानला पाहून 4 वर्षांचा जगनबीर आपले सर्व त्रास विसरला. सलमान खानने त्याच्या शेजारी बसून तासंतास गप्पा मारल्या.

Salman Khan kept His Promise and met his 9 years old Fan Who was battling cancer Boosted his morale

ADVERTISEMENT

वाचा : राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात, ‘मुख्यमंत्र्यांनी उपटा-उपटी थांबवून…’

पहिल्या भेटीत दिलेलं वचन सलमानने केलं पूर्ण

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, हॉस्पिटलच्या डीनला सलमान खानच्या टीमकडून फोन आला. सलमानला जगनबीरच्या आईला भेटायचे आहे त्यांना घरी बोलावले आहे हे सांगण्यास सांगितले. गेल्या महिन्यात जगनबीर आणि त्याचे कुटुंबीय सलमानला भेटायला गेले होते आणि अशा प्रकारे, जगनबीरने धैर्याने लढण्याचे वचन पूर्ण केले, तर सलमाननेही आपले वचन मोडले नाही आणि जगनबीरचे स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT