Shatrughan Sinha : शत्रुघ्न सिन्हांची प्रकृती बिघडली, मोठं कारण आलं समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

sonakshi sinhas father shatrughan sinha hospitalized after zaheer iqbal wedding certain pain in ribs area admiited kokilaben hospital
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल देखील वडिलांच्या भेटीला रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.
social share
google news

Shatrughan Sinha Health Update: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (sonakshi sinha) 23 जूनला प्रियकर झहीर इक्बाल (zaheer iqbal) सोबत लग्नगाठ बांधली होती. या लग्नाच्या दोन दिवसानंतर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल देखील वडिलांच्या भेटीला रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. या दरम्यान अनेक उलट सूलट चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र सिन्हा यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आलं होतं? याचं नेमकं कारण समोर आलं नव्हतं. आता हे कारण समोर आलं आहे. (sonakshi sinhas father shatrughan sinha hospitalized after zaheer iqbal wedding certain pain in ribs area admiited kokilaben hospital)  

ADVERTISEMENT

सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हा यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर एक वेगळेच कारण समोर आले होते. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, 25 जूनला सिन्हा यांच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. सिन्हा हे सोफ्यावरुन उठत असताना त्यांचा पाय कार्पेटच्या कोपऱ्यावर आदळला होता. या दरम्यान त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : पंकजा मुंडेंसह 10 भाजपचे दहा नेते शर्यतीत, मविआ कुणाला देणार संधी?

मीडिया रिपोर्टनुसार,  सुदैवाने सोनाक्षी त्या ठिकाणी उपस्थित असल्याने सिन्हा यांना होणारा मोठा अपघात टळला होता. कारण तिने वडिलांना कोसळताना सावरले होते. या घटनेनंतर सिन्हा यांनी बरगड्यांच्या भागात वेदना होत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात अॅडमिट होण्याचा सल्ला दिला होता. यामध्ये डॉक्टर त्यांची नियमित तपासणी करणार होते आणि त्यांना वेदना होत असलेल्या ठिकाणची चाचणी करणार होते. दरम्यान आज 1 जुलैला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती होती.मात्र अद्याप त्यांना डिस्चार्ज देण्यात आला नाही. 

हे वाचलं का?

दरम्यान सोनाक्षीच्या झहीर इक्बालसोबतच्या लग्नाला वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा विरोध असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. मात्र सोनाक्षीच्या लग्नातील फोटो पाहून या सगळ्या चर्चांना पुर्णविराम मिळाला होता. 

हे ही वाचा : Vidhan Sabha election : जानकरांनी महायुतीची वाढवली चिंता, भाजप कसा काढणार तोडगा?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT