Vidhan Parishad Election : पंकजा मुंडेंसह 10 भाजपचे दहा नेते शर्यतीत, मविआ कुणाला देणार संधी?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

महायुती आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार कोण आहेत?
विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधान परिषद निवडणूक 2024

point

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी

point

भाजपकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली जाणार, सूत्रांची माहिती

vidhan parishad election 2024 : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. प्रत्येक पक्षात इच्छुकांकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यापैकी कोणाला संधी मिळेल हे लवकरच स्पष्ट होईल, पण संभाव्य उमेदवार म्हणून काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. (Vidhan Parishad Election Candidates)

ADVERTISEMENT

महायुतीचे संभाव्य उमेदवार 

विधान परिषदेसाठी १० नावे महाराष्ट्र भाजपनं पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याची माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधान परिषदेसाठी ही नावे पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवली आहे. यात पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांना उमेदवारी दिली जाणार हे जवळपास निश्चित असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भाजपमधील या नेत्यांची नावे शर्यतीत 

1) पंकजा मुंडे
2) अमित गोरखे
3) परिणय फुके
4) सुधाकर कोहळे
5) योगेश टिळेकर
6) निलय नाईक
7) हर्षवर्धन पाटील
8) रावसाहेब दानवे
9) चित्रा वाघ
10) माधवी नाईक

हे वाचलं का?

हेही वाचा >> जानकरांनी महायुतीची वाढवली चिंता, भाजप कसा काढणार तोडगा?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांची नावे शर्यतीत आहे. पक्षाकडून लवकरच याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभेत उमेदवारी न मिळालेल्या भावना गवळी, हेमंत पाटील आणि कृपाल तुमाने यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. माजी आमदार मनिषा कायंदे, किरण पावसकर आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांची नावेही शर्यतीत आहेत. 

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी संभाव्य उमेदवार :

1) काँग्रेसकडून अल्पसंख्यांक चेहऱ्याला संधी देण्याचा विचार आहे. कांदिवलीतून पराभूत झालेले नसीम खान यांचे नाव चर्चेत आहे.  

2) शरद पवारांच्या राष्ट्रवादी कांग्रेसकडून तरुण चेहरा देण्यावर भर होता. मात्र शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत वरिष्ठांचं एकमत झाले आहे. शरद पवार यांनीही पत्रकार परिषदेत विधान परिषदेत उमेदवार देणार नसल्याचे म्हटलेले आहे.

हेही वाचा >> बबन गित्तेंनी डोक्यात घातली गोळी, परळीत राष्ट्रवादीच्या सरपंचाची हत्या कशी झाली?

3) शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अमरावतीचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय नागपुरातील तरुण उद्योजक जयदीप पेंडके यांच्या नावाची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT