Jacqueline Fernandez ला अटक का केली नाही? कोर्टाचा ईडीला प्रश्न

वाचा सविस्तर बातमी, नेमकं कोर्टाने काय म्हटलं आहे? जॅकलिनने काय आरोप केले आहेत?
Why Not Arrest Jacqueline Fernandez Why Pick-And Choose? Court Asks ED
Why Not Arrest Jacqueline Fernandez Why Pick-And Choose? Court Asks ED

२०० कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अटक का केली नाही? असा प्रश्न कोर्टाने ईडीला विचारला आहे. आज जॅकलिन फर्नांडिस तिच्या नियमित सुनावणीसाठी पटियाला हाऊस कोर्टात आली होती. कोर्टाने आज जॅकलिनच्या जामिनावरचा युक्तिवाद ऐकून घेतला. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान जॅकलिन फर्नांडिसच्या वतीने ईडीवर काही आरोप करण्यात आले आहेत.

काय म्हटलं आहे जॅकलिन फर्नांडिसने?

माझ्यावरचे सगळे आरोप हे निराधार आणि बिनबुडाचे आहेत असं जॅकलिन फर्नांडिसने म्हटलं आहे. मी माझ्या कामासाठी विदेशात जात असते. मात्र मला विदेशात जाण्यापासूनही रोखण्यात आलं. मी गेल्या वर्षी च्या जानेवारी महिन्यात आईला भेटायला जाणार होते पण मला आईलाही भेटायला जाऊ दिलं नाही.

Why Not Arrest Jacqueline Fernandez Why Pick-And Choose? Court Asks ED
जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखरमुळे ईडीच्या जाळ्यात कशी अडकली?

कोर्टाने काय म्हटलं आहे?

एलओसी जारी करूनही तुम्ही अद्याप जॅकलिन फर्नांडिसला अटक का केली नाही? इतर आरोपी तुरुंगात आहेत तुम्ही या मनी लाँड्रींग प्रकरणात निवडक लोकांनाच अटक करत आहात का? असा प्रश्न कोर्टाने आज विचारला आहे.

Why Not Arrest Jacqueline Fernandez Why Pick-And Choose? Court Asks ED
इंटिमेट फोटो लिक झाल्याने नाराज झाला सुकेश, सांगितलं जॅकलिनला महागडी गिफ्ट देण्याचं कारण

जॅकलिनच्या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीने काय म्हटलं आहे?

जॅकलिनने देश सोडून जाण्याचा प्रयत्न केला. तिने तपासकर्त्यांना सहकार्य केलं नाही. आम्ही आमच्या आयुष्यात कधी ५० लाख रूपयेही पाहिले नाहीत पण जॅकलिनने फक्त मजा करण्यासाठी आणि चैन म्हणून ७ कोटी रूपये खर्च केले. पळून जाण्यासाठी जॅकलिनने प्रत्येक मार्गाचा अवलंब केला कारण तिच्याकडे भरपूर पैसे आहेत असं ईडीने कोर्टाला सांगितलं आणि तिच्या जामिनाला विरोध केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींहून अधिक रकमेच्या खंडणीचा आरोप आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता सुकेशने अभिनेत्री जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्याचे आढळून आले. त्यानंतर ईडीने कारवाई करत त्याची 7 कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर ईडीने आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रानुसार, डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिने सुकेशच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही. सुकेश चंद्रशेखरची सहाय्यक पिंकी इराणी हिने त्याला जॅकलीनला भेटायला लावल्याचेही आरोपपत्रात उघड झाले आहे. सुकेश त्याची सहकारी पिंकी मार्फत जॅकलिनला महागड्या भेटवस्तू पाठवत असे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in