अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट? मालदीववरुन परतल्यावर का गेली थेट हॉस्पिटलमध्ये?
मुंबई: मालदीवच्या सुट्टीवरून परतल्यानंतर अनुष्का शर्मा तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीसोबत मंगळवारी अचानाक हॉस्पिटलमध्ये गेली असल्याचं समोर आलं आहे. सुट्टीवरून परत आल्यानंतर लगेचच या जोडप्याला हॉस्पिटलमध्ये जाताना पाहून आता अनेक जण अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा करु लागले आहेत. पण खरी गोष्ट ही आहे की, अनुष्का ही आपल्या फिजिओथेरपिस्टला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. ती गरोदर नाही. […]
ADVERTISEMENT

मुंबई: मालदीवच्या सुट्टीवरून परतल्यानंतर अनुष्का शर्मा तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीसोबत मंगळवारी अचानाक हॉस्पिटलमध्ये गेली असल्याचं समोर आलं आहे. सुट्टीवरून परत आल्यानंतर लगेचच या जोडप्याला हॉस्पिटलमध्ये जाताना पाहून आता अनेक जण अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा करु लागले आहेत. पण खरी गोष्ट ही आहे की, अनुष्का ही आपल्या फिजिओथेरपिस्टला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. ती गरोदर नाही.
आदल्या दिवशी सुट्टीवरून मुंबईत परतल्यानंतर लगेचच अनुष्का आणि विराट कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात गेले. त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करत आहेत.
काही लोकांनी अनुष्काच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली तर काहींनी गर्भधारणेबद्दल अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आता या जोडप्याने रुग्णालयात जाण्याचे कारण स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत गर्भधारणेचा अंदाज लावणाऱ्यांना नेमकं काय ते उत्तर मिळालं आहे.
मालदीवमधील अनुष्काचे खास फोटो