मन उडू उडू झालं फेम अजिंक्य राऊतचं इंस्टाग्राम अकाऊंट झालं हॅक, काय आहे नेमकं कारण?

अजिंक्य राऊत सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल आहेत.
मन उडू उडू झालं फेम अजिंक्य राऊतचं इंस्टाग्राम अकाऊंट झालं हॅक, काय आहे नेमकं कारण?
Marathi actor Ajinkya Raut filed FIR after his Instagram account got hacked

'मन उडू उडू झालं’ मालिकेत अजिंक्य राऊत आणि ऋता दुर्गुळे या दोघांची जोडी मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत त्यांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. अभिनेता अजिंक्य राऊत याने या मालिकेत इंद्राची भूमिका साकारली आहे. अजिंक्य राऊत सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल आहेत.

आता अजिंक्यचे इंस्टाग्राम बंद आहे, त्याचे इन्स्टा अकाउंट कोणतरी हॅक केले आहे. अजिंक्यने त्याचे इन्स्टा डीलिट केले आहे. इन्स्टा अकाऊंट ‘व्हेरिफाय’ करण्यासाठी अजिंक्यला एक मेसेज आला होता. त्या मेसेजला रिप्लाय देताना अजिंक्यने चुकून युजरनेम आणि पासवर्ड सांगितला. यानंतर त्याचं अकाऊंट हॅक झाले. अजूनही हॅकर कोण आहे याचा तपास लागलेला नाही.

‘मन उडु उडु झालं’ या मालिकेतून अजिंक्यने टेलिव्हिजनवर पदार्पण केले. त्याच्या एका मालिकेने त्याला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. मालिकेतील इंद्रा नावाची त्याची भूमिका सगळ्यांना आवडते. सगळेजण त्या भूमिकेचे कौतुक देखील करतात. मालिकेतील या जोडीच्या रील्स देखील इंस्टाग्रामवर मोठया प्रमाणात व्हायरल होतात.दरम्यान, अजिंक्य देखील त्याचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. पण त्याचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्यामुळे तो सोशाल मिडीयावर काही दिवस दिसणार नाही. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in