Video : अरबाज किंवा निक्की आज घराबाहेर जाणार...,भाऊच्या धक्क्यावर कुणाचा होणार गेम?
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये असल्याचे बिग बॉस सांगतायत.यानंतर निक्की प्रोमोत रडताना दिसतेय. त्यामुळे अरबाज (Arbaz Patel) आणि निक्कीपैकी (Nikki Tamboli)भाऊच्या धक्क्यावर कुणाचा गेम होणार? हे पाहणे आज महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बिग बॉसच्या घरातून आज नेमका कोण बाहेर जाणार?
जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर झाले सेफ
अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी डेंजर झोनमध्ये
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री मारणाऱ्या संग्राम चौगुलेची दुखापतीमुळे अवघ्या दोनच आठवड्यात घरातून एक्झिट झाली आहे. त्यानंतर आज नेमका कोण बाहेर जाणार आहे? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या संदर्भातला एक प्रोमोही समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये असल्याचे बिग बॉस सांगतायत.यानंतर निक्की प्रोमोत रडताना दिसतेय. त्यामुळे अरबाज (Arbaz Patel) आणि निक्कीपैकी (Nikki Tamboli)भाऊच्या धक्क्यावर कुणाचा गेम होणार? हे पाहणे आज महत्वाचे ठरणार आहे. (bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel in danger zone janhavi killekar suraj chavan varash usgaonkar are safe bigg boss marathi season 5)
ADVERTISEMENT
बिग बॉसच्या आठव्या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या पाच सदस्यांपैकी कोण या आठवड्यात एलिमिनेट होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. या दरम्यान कलर्स मराठीने बिग बॉसचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सेफ झालेले सदस्य आणि घराबाहेर पडणाऱ्या सदस्यांचा खुलासा करण्यात आला आहे.
हे ही वाचा : Bigg Boss Marathi : 'अरबाजला वाचवण्यासाठी संग्रामचा बळी', 'त्या' आरोपावर चौगुले काय म्हणाला?
नवीन प्रोमोमध्ये एलिमिनेशन प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. यामध्ये घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झालेल्या अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर या सदस्यांसमोर एक सुटकेस ठेवण्यात आली आहे. या सुटकेसमध्ये सेफ असल्याची पाटी ठेवण्यात आली आहे. प्रोमोमध्ये सुरज, जान्हवी आणि वर्षाताई सेफ झाल्याचे दाखवण्यात आले आहे. तर अरबाज आणि निक्की डेंजरझोनमध्ये असल्याचे बिग बॉस सांगत आहेत.
हे वाचलं का?
बिग बॉस यावेळी घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचे नाव घोषित करताना निक्की अरबाजला मिठी मारून जोरजोरात रडताना दिसत आहे. पण दोघांपैकी नेमकं कोण घराबाहेर जाणार आहे? हे प्रोमोत दाखवण्यात आलं नाही आहे. त्यामुळे अरबाज आणि निक्कीपैकी कोण घराबाहेर जाणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा : Aishwarya-Abhishek Divorce : ...म्हणून ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची होतेय तुफान चर्चा, 17 वर्षात बदलल्या 'या' गोष्टी
दरम्यान चाहत्यांच्या मते निक्की तंबोळी घराबाहेर पडेल, असे अनेकांचे म्हणणे आहे. कारण अरबाज हा घराचा कॅप्टन झाला आहे. त्यामुळे तो एलिमिनेट होणार नसल्याची चर्चा आहे. काही चाहत्यांच असेही म्हणणे आहे की, आज एलिमिनेशन होणार नाही आहे. कारण आधीच संग्रामच्या रूपात एक सदस्य दुखापतीमुळे घराबाहेर गेला आहे. त्यामुळे या आठवड्यात एलिमिनेशन होण्याची शक्यता कमी आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT