Dharmaveer 2 : 'धर्मवीर 2'मध्ये 'हिंदुत्वा'वर जोर! तुम्ही टीझर पाहिलात का?
Dharmaveer 2 Teaser : ’धर्मवीर 2’, 9 ऑगस्ट 2024 रोजी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्रांती दिनाच्या औचित्याने प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

"धर्मवीर 2" हा चित्रपट येत्या 9 ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

"धर्मवीर 2" च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला

या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.
Dharmaveer 2 Teaser launch : शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर’ने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा मनात अधिराज्य गाजवले. आता या ‘धर्मवीर’ सिनेमाचा नवा भाग म्हणजेच ‘धर्मवीर 2’, 9 ऑगस्ट 2024 रोजी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्रांती दिनाच्या औचित्याने प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. (dharmaveer 2 teaser launched When movie will be release know all details about it)
स्वर्गीय आनंद दिघे साहेब दिसत असलेल्या या टीजरमध्ये 'ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की' या दमदार डायलॉगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. "धर्मवीर 2" हा चित्रपट येत्या 9 ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
हेही वाचा : Supriya Sule : विधान परिषद निवडणुकीआधी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, पडद्यामागे काय घडतंय?
"धर्मवीर2" या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेरामॅन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे. काही दिवसांपूर्वीच "धर्मवीर 2" चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले होते.
हेही वाचा : Worli Accident : साडी अडकली तरी थांबला नाही; शिवसेना नेत्याचा मुलगा नंतर...
"धर्मवीर 2" च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता "धर्मवीर 2" मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे.