बिकिनी, टिकली अन् बांगड्या! प्रियांका चोप्राच्या फोटोने वातावरण तापले; रणवीर, नीक म्हणाले...

अलीकडेच देसी गर्लने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 2000 सालचा आहे.
Priyanka Chopra
Priyanka ChopraInstagram

बॉलीवूडमधील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेली प्रियांका चोप्रा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले नाव गाजवत आहे. बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. प्रियांका चोप्रा अनेकदा तिच्या थ्रोबॅक फोटोंमुळे चर्चेत असते. प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर सतत करत असते.

अलीकडेच देसी गर्लने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 2000 सालचा आहे. प्रियांका चोप्राच्या या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींकडून कमेंट येत आहेत. त्याचवेळी या फोटोवर नवरा निक जोनस सोबत रणवीर सिंगनेही कमेंट केली आहे त्यामुळे हा फोटो आणखी चर्चेत आला आहे.

रणवीर सिंग, निक कमेंट करत म्हणाले...

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर 2000 सालचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना देसी गर्ल प्रियांका चोप्राने लिहिले- 'नोव्हेंबर 2000. मी 18 वर्षांची आहे.' प्रियांकाने हा फोटो टाकाताच तिच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडला. प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने तिच्या पोस्टवर फायर इमोजीची कमेंट केली आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने प्रियांका चोप्राच्या थ्रोबॅक फोटोवर पंजाबी शैलीत 'ब्रुहह' लिहिले आहे.

रणवीरच्या या कमेंटनंतर प्रियांकानेही यावर प्रतिक्रिया दिली. हेड बॅंगिंग इमोजी बनवून तिने 'बडी' असे लिहिले आहे. रणवीर सिंगच्या या कमेंटवरही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. देसी गर्ल प्रियांका चोप्राचा हा थ्रोबॅक फोटो तिच्या चाहत्यांनाही आवडला आहे.

फरहान अख्तरच्या चित्रपटात प्रियांका चोप्रा

बॉलिवूडची स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील असणार आहे. प्रियांका चोप्राने नुकतेच Amazon Prime ची सीरीज 'Citadel' चे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय प्रियांका चोप्रा 'द मॅट्रिक्स 4' मध्येही दिसली आहे. आता लवकरच प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

प्रियांका चोप्रा 2019 मध्ये द स्काय इज पिंकमध्ये दिसली होती. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचे फारसे प्रेम मिळू शकले नाही. हे लक्षात घ्यावे की निक जोनास आणि प्रियांकाने 2018 मध्ये लग्न केले होते. या दाम्पत्याने सरोगसीतून एका मुलीला जन्मही दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in