राज ठाकरेंनी सरसेनापती हंबीरराव सिनेमाचं केलं कौतुक, प्रवीण तरडेंना दिला हा सल्ला...

प्रवीण तरडे म्हणाले राज ठाकरे भेटीत फक्त सिनेमांविषयी बोलत होते.
राज ठाकरेंनी सरसेनापती हंबीरराव सिनेमाचं केलं कौतुक, प्रवीण तरडेंना दिला हा सल्ला...
Raj Thackeray praises 'Sarsenapati Hambirrao' movie directed by Pravin Tarde

अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सडेतोड संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येते आहे. या सिनेमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. याबाबतीत प्रवीण तरडेंनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत झालेल्या गप्पांविषयी त्यांनी सांगितले आहे.

प्रवीण तरडे या मुलाखतीत बोलताना म्हणाले, की “एक दिग्दर्शक आणि अभिनेत्याची राजकारणातील चित्रपट प्रेमी म्हणजे राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. यावेळी महाराष्ट्राच्या आणि भारतीय सिनेमाविषयी काय चर्चा झाली?” यावर उत्तर देत प्रवीण तरडे म्हणाले, “आम्ही दीड-दोन तास गप्पा मारत होतो आणि राज साहेब फक्त सिनेमांविषयी बोलत होते. मराठी सिनेमा त्याची पुढची वाटचाल, टेक्नॉलॉजी, VFX, भाषेचे अडथळे, सबटायटल्स यात मराठी चित्रपट कसा टिकणार?”

पुढे प्रवीण तरडे म्हणाले, “राज साहेब पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या चित्रपटांनी कसं स्वत: चं स्थान मिळवलं पाहिजे. कारण रोज ते एक चित्रपट पाहून झोपतात. महाराष्ट्राला ही एक परंपरा आहे…मग शरद पवार साहेब असतील, राज साहेब असतील, स्वत: बाळासाहेब ठाकरे हे चित्रपटाचे भक्त होते म्हणून कलाकारांवर त्यांचं प्रेम होतं. त्यामुळे राज साहेबांच्या बोलण्यात चित्रपटाचे कॅमेरा अॅंगल, लेनसेल अॅक्सेस यावर बोलत होते. यावेळी हंबीररावबद्दल त्याच्या भव्यतेबद्दल चर्चा झाली कारण त्यांनी टिझर आणि ट्रेलरवर चर्चा झाली आणि त्यांनी कौतुक केलं म्हणाले मराठी चित्रपट जर या दर्जाला येत असेल तर याचं भविष्य आणि वाटचाल खूप चांगली आहे.”

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in