सलमानच्या सर्पदंशावर रविना टंडनची भन्नाट पोस्ट.. म्हणाली ‘साप मेला असेल’

भाईजान सलमान खानला झालेल्या सर्पदंशावर रविना टंडनने ट्वीट करत सलमानची खिल्ली उडवली आहे.
सलमानच्या सर्पदंशावर रविना टंडनची भन्नाट पोस्ट.. म्हणाली ‘साप मेला असेल’

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा २७ डिसेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या एक दिवस आधी सलमानला पनवेलच्या फार्महाऊसवर सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर सलमानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणावर अभिनेत्री रविना टंडनने ट्वीट करत सलमानची खिल्ली उडवली आहे.

रविना टंडन ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. आता रविनाने सलमानला सर्पदंश झाल्यावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खिल्ली उडवली आहे.

रविनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमानसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘माझ्या हिरोला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू माझ्यासाठी नेहमीच खास आहेस. ‘साप मेला असेल’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सध्या रविनाची ही पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

नुकताच सलमानला त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर सर्पदंश झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया समोर आल्यावर सलमान म्हणाला की, त्याला सगळ्यात पहिलं गिफ्ट हे त्या सापाने दिलं आहे. “माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता. मी काठीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याचवेळी तो साप माझ्या हाताजवळ आला. मी त्याला सोडण्यासाठी पकडले असता त्याने मला दंश केला. त्यानंतर तिथे गोंधळ झाला आणि त्या सापाने पुन्हा एकदा मला दंश केला असा त्यानं मला तीन वेळा दंश केला. तर सापाने केलेले हे कृत्य पाहता त्यानेच वाढदिवसाचं पहिलं गिफ्ट दिलं” असं सलमान म्हणाला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in