अमिताभ बच्चन पुन्हा विचारणार प्रश्न; लवकरच येणार केबीसीचा 13वा सिझन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिका तसंच सिनेमांच्या शूटींमध्ये फार अडथळा येतोय. काही मालिकांचं शूटींग बंद आहे. अशातच प्रेक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. लवकरच अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीचा नवी सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कौन बनेगा करोडपती शोच्या रजिस्ट्रेशनची तारखेची देखील घोषणा करण्यात आली आहे.

सोनी चॅनेलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यांची माहिती दिली आहे. हे केबीसीचं 13वं सिझन आहे. इन्स्टाग्रामवर नमूद केल्यानुसार, “मिस्टर अमिताभ बच्चन पुन्हा एकदा प्रश्न घेऊन येत आहेत. तर तुमचा फोन उचला कारण 10 मे पासून केबीसीच्या तेराव्या सिझनचं रजिस्ट्रेशन सुरु होतंय.” कोरोनाच्या या कठीण काळात कौन बनेगा करोडपती पुन्हा एकदा सुरु होणार असल्याचे प्रेक्षक देखील खूश आहेत.

केबीसीचा 12 सिझन गेल्या वर्षी 28 डिसेंबरला ऑन एअर करण्यात आला होता. भोपाळच्या आरती जगताप या शोच्या पहिल्या कंटेस्टेंट होत्या. तर 12 व्या सिझनच्या नजिया नजीम 1 करोड जिंकणाऱ्या पहिल्या कंटेस्टेंट होत्या. 22 जानेवारी रोजी सिझनचा शेवटचा एपिसोड झाला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नुकतंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सध्याच्या कठीण परिस्थितीत जे लोकं कोरोनाशी लढत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. त्याचसोबत अमिताभ यांनी सुरक्षित राहून नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT