राजेश साप्ते यांचा बळी घेणाऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचायचं असेल तर राम कदमांना करा अटक
मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आल्यानंतर मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. राजू साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितल आहे होते. या प्रकरणी आता नरेश मिस्त्रीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.याप्रकरणी वाकड पोलिसांनी पाच जणांवर […]
ADVERTISEMENT
मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आल्यानंतर मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. राजू साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितल आहे होते. या प्रकरणी आता नरेश मिस्त्रीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.याप्रकरणी वाकड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला मुंबईतून अटक केली आहे. चंदन रामकृष्ण ठाकरे (वय ३६, रा. जीवनज्योती सोसायटी, कांदिवली वेस्ट, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी भाजपचे नेते व आमदार राम कदम यांना या प्रकरणी अटक करावी अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
‘गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे भाजप आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली जे गुंडाराज सुरू आहे त्यानेच कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांचा बळी घेतला असून खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचायचं असेल तर राम कदम यांना ताबडतोब अटक केली पाहिजे’, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. यावेळी राम कदम यांच्यावर विद्या चव्हाण यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.विद्या चव्हाण यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगत गोरेगावच्या चित्रनगरीत कशाप्रकारे गुंडाराज सुरू असल्याचे दाखले दिले आहेत. ‘दोन दिवसांपूर्वी कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्येपूर्वी राजेश साप्ते यांनी सुसाइड नोटमध्ये ज्यांची नावे लिहिली आहेत, त्यांनी गेली अनेक वर्षे सुमारे ४५ हजारांवर कामगारांना वेठीस धरले आहे.
हे वाचलं का?
कोरोनाच्या काळात लागू असलेल्या लॉकडाऊन काळात सलमान खान, यशराज फिल्म्स आणि इतर काही निर्मिती संस्थांनी कामगारांसाठी ५० कोटी रुपये मदत म्हणून दिले होते. पण संबंधित युनियनने त्यातील २ कोटी देखील गरीब कामगारांना मिळू दिले नाहीत. गोरेगावची संपूर्ण चित्रनगरी या लोकांनी काबीज केली असून तिथे गुंडाराज चालले आहे. भाजप आमदार राम कदम या सर्वांचे नेतृत्व करत असून त्यांना ताबडतोब अटक झाली तरच खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचता येईल,’ असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. यावर भाजप आमदार यांनी राम कदम यांच्याशी संपर्क केला असता .माझा या संघटनेशी २०१९ पासून संबंध नाही अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT