श्रीमंतीचा एक अजब मंत्र सांगणाऱ्या ‘कंदील’ सिनेमाचं मोशन पोस्टर लाँच

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

‘‘हातात घेऊन सपनाची भिंग निघाले बघाया सशाचे शिंग पोरांना चढली श्रीमंतीची झिंग’’ या वनलाईनवर आधारलेला एक नवा कोरा सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय. ‘कंदील’ असं या सिनेमाचं नाव असून 19व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पिफ) सिनेमाची निवड झाली आहे. महेश कंद या नवोदित दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला ‘कंदील’ देश-विदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये हजेरी लावणार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एल. के. पिक्चर्स या बॅनरअंतर्गत निर्माते लक्ष्मण कंद, अभिजीत कंद आणि महेश कंद यांनी सोशल मीडियावर मोशन पोस्टर रिलीज करत ‘कंदील’ सिनेमाची घोषणा केली आहे. आशा आणि निराशेच्या लाटेवर स्वार होऊन श्रीमंत होऊ पाहणा-या स्लममधील पाच मुलांची अनोखी कथा ‘कंदील’मध्ये पहायला मिळणार आहे. नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या मोशन पोस्टरला कंदीलाची पार्श्वभूमी असून, पाच तरूण दिसतात. एका झाडाखाली असलेल्या दगडावर तीन तरूण बसलेले आहेत, चौथा तरूण झाडाला टेकून तर पाचवा हाताची घडी घालून जणू भविष्यावर नजर रोखून उभा आहे. “श्रीमंत… श्रीमंत…’’ या गाण्याच्या पार्श्वसंगीताची संगीतमय जोड या मोशन पोस्टरला देण्यात आली आहे. मोशन पोस्टर पाहिल्यावर या सिनेमात काहीतरी वेगळं आणि वर्तमान समाजव्यवस्थेवर मनोरंजन शैलीत भाष्य करणारं कथानक पहायला मिळणार याची जाणीव होते.

कोरोनामुक्त झाल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापटने पहिल्यांदाच केलं ‘हे’ मोठं काम

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘कंदील’चं दिग्दर्शन करणा-या महेश कंद याचा इथवरचा प्रवास खूप संघर्षमय आहे. ‘कंदील’ची कथा हातात आल्यानंतर महेशने हा विषय पडद्यावर कशा पद्धतीने मांडायचा यासाठी तीन वर्ष स्लम मध्ये जाऊन रिसर्च केला. विशेष म्हणजे संपूर्ण सिनेमा आधी मोबाईलमध्ये शूट करून पाहिला आणि नंतरच प्रत्यक्ष शूटींगला सुरूवात केली. शूटींग करतानाही ‘कंदील’च्या टीमला ब-याच समस्यांचा सामना करावा लागला, तरीही न डगमगता महेशनं नवोदित कलाकार-तंत्रज्ञांचा संच सोबत घेऊन अखेर कंदील पेटवलाच. आज या कंदीलाचा प्रकाश सिनेमहोत्सवांच्या माध्यमातून देश-विदेशात आणि त्यानंतर प्रत्येक घराघरात प्रकाशाची किरणं पोहोचणार आहे.

ADVERTISEMENT

‘कंदील’मध्ये महेश कंद, लक्ष्मण साळुंके, विनोद खुरंगळे, मंदार फाकटकर, दिव्यराज ओव्हाळ, दिलीप अष्टेकर आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. अमरजीत आमले यांनी ‘कंदील’ची पटकथा लिहीली असून, महेश कंद आणि सुहास मुंडे यांच्या साथीनं त्यांनी गीतलेखनही केलं आहे. यावर्षा फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये बाजी मारलेले तसेच ‘वळू’ व ‘देऊळ’ चित्रपटांचे संगीतकार मंगेश धाकडे यांनी गीतरचना संगीतबद्ध केल्या असून नंदेश उमप, जे. सुबोध आणि चंद्रदीप भास्कर यांनी ती गीते गायलेली आहेत. साऊंड मिक्सिंगचं काम अनुप देव यांनी केलं असून राष्ट्रीय पारितोषिक विजेता साऊंड डिझायनर महावीर साबन्नावर याने साऊंड डिझाईन केलं आहे. सिनेमॅटोग्राफी प्रसाद मोरे यांनी केली असून प्रॉडक्शन मॅनेजरची जबाबदारी विनोद खुरंगळे यांनी सांभाळली आहे. निलेश रसाळ आणि दिनेश भालेराव यांनी संकलन केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT