Nana Patekar : चाहत्याच्या डोक्यात मारली जोरात चापट; समोर आलं खरं कारण
nana patekar slaps fan video : नाना पाटेकर यांनी एका चाहत्याच्या डोक्यात चापट मारल्याचा व्हिडीओ खूपच व्हायरल झालाय. यावर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT

Nana Patekar slaps fan : सेल्फीसाठी एक मुलगा जवळ येतो आणि नाना पाटेकर त्याच्या डोक्यात जोरात चापट मारतात. त्यानंतर काही तरी पुटपुटतात. शुटिंग दरम्यान घडलेला हा सर्व प्रकार कुणीतरी रेकॉर्ड केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर नाना पाटेकरांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली, तर अनेकांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. दरम्यान, या व्हिडीओत घडलेला प्रकार वेगळाच असून, याबद्दल चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मोठा खुलासा केला आहे.
नानांचा व्हिडिओ वाराणसीतील दशाश्वमेध घाटावरील आहे. नाना पाटेकर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘जर्नी’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दशाश्वमेध घाटाच्या वाटेवर नानांच्या ‘जर्नी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. कपडे आणि टोपी घालून नाना शूटिंगसाठी तयार झाले होते. नानांचे लक्ष शूटिंग आणि त्यांच्या संवादांवर होते.
नाना पाटेकरांनी मारली डोक्यात चापट
तेवढ्यात मागून एक मुलगा आला आणि त्याने नानांना सेल्फी काढण्याची विनंती करायला सुरुवात केली आणि मग परवानगी न घेता नानासोबत सेल्फी काढली.नानाला त्या चाहत्याची ही कृती अजिबात आवडली नाही.त्याचा संयम सुटला आणि मग ते मुलावर चिडले. त्यानंतर त्यांनी चाहत्याला चप्पल मारली.
हे ही वाचा >> ‘ऐश्वर्यासोबत लग्न करू आणि मुलंही…’, अब्दुल रझाक काय बरळला?
जोरात चापट मारल्यानंतर नाना त्या मुलाला काहीतरी बोलताना दिसले. दरम्यान, चित्रपटाच्या क्रू मेंबरने या मुलाच्या गळ्याला पकडून त्याला तेथून दूर नेले. नाना पाटेकरांनी फॅनला चापट मारल्याने लोकांमधून संताप व्यक्त होत आहे. नाना पाटेकरांना यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.