Nitin Desai Suicide: …म्हणून नितीन देसाईंनी केली आत्महत्या?
Nitin Desai Desai: बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी (2 ऑगस्ट) सकाळी आपल्या कर्जतमधील ND स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने अवघ्या बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. जाणून घ्या त्यांच्या आत्महत्येमागचं कारण.
ADVERTISEMENT

Nitin Desai Suicide Reason: मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीसह अवघ्या महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी आज (2 ऑगस्ट) सकाळीच समोर आली. बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्वांनाच प्रचंड धक्का बसला आहे. या वृत्ताने अवघ्या सिनेविश्वावर शोककळा कोसळली आहे.
जो स्टुडिओ स्वत:च्या हाताने घडवला, तिथेच संपवलं आयुष्य…
नितीन देसाई हे कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्यासारख्या दिग्गज कला दिग्दर्शकाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत आता अनेक उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक हे घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत.
नितीन देसाई यांचा मृत्यू कधी आणि कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूचे कारण आर्थिक तंगी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई काल रात्री दहा वाजता त्यांच्या खोलीत गेले. पण आज सकाळी ते बराच वेळ बाहेर आले नाही. त्यानंतर त्यांचा बॉडीगार्ड आणि इतर लोकांनी दरवाजा ठोठावला, मात्र त्यांनी दरवाजा उघडला नाही. खिडकीतून पाहिल्यावर नितीन देसाई यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसून आला. त्यानंतर याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहचताच पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात पाठवला.
हे ही वाचा >> Nitin Desai : खिडकीतून बघितलं अन् बॉडीगार्ड हादरला; एनडी स्टुडिओत काय घडलं?
नितीन देसाई 9 ऑगस्ट रोजी त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा करणार होते. मात्र खेदाची गोष्ट म्हणजे वाढदिवसापूर्वीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.