Salim Khan : बाबा सिद्दीकींच्या हत्येवर स्पष्ट बोलले, सलीम खान लेकाच्या पाठीशी उभे राहिले

मुंबई तक

ADVERTISEMENT

सलीम खान काय म्हणाले?
सलीम खान काय म्हणाले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली का?

point

सलीम खान पहिल्यांदाच बोलले

point

सिद्दीकी सलमानचेे नीकटवर्तीय असल्यानं घडली घडना?

Salim Khan on Baba Siddique Case मुंबई :  अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची आठवडाभरापूर्वी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयसमोर शार्प शूटर्सनी त्यांना अडवून धडाधड गोळ्या चालवल्या. यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळासह बॉलिवूडमध्येही खळबळ उडाली आहे. यावेळी झिशान सिद्दीकी हे वाहनात नव्हते, त्यामुळे ते वाचले अन्यथा त्यांनाही मारण्याचा प्लॅन होता असं समोर आलंय. बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे नीकटवर्तीय असून, सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर ते सलमानच्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच त्यांना संपल्याचं बोललं जातंय. मात्र खरंच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण हेच आहे का, हे तपासतूनच स्पष्ट होईल. त्यातच आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान यांनी या विषयावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Salman Khan's Father Salim Khan Reaction on Baba Siddique Murder Case and Lawrence Bishnoi Row)

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Baba Siddique Case : आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडला बाबा सिद्दींकीच्या मुलाचा फोटो, स्नॅपचॅटवरुन...

 

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर समोर आलेल्या माहितीमधून लॉरेन्स गँगने 'जे सलमानसोबत उभे राहतील, त्यांना संपवू' असा इशाराच दिल्याचं दिसून येतंय. मात्र, एबीपीला न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना थेट प्रश्न विचारण्यात आला. सलमानचा नीकटर्तीय असल्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली का? या प्रश्नावर सलीम खान व्यक्त झाले. ते म्हणाले की, असं काहीच नाही.  सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेमध्ये काहीही संबंध नाही असं सलीम खान म्हणाले आहेत. तसंच या प्रकरणाचा आणि सलमानचा संबंध कसा जोडला जाऊ शकतो हे आपल्याला समजत नसल्याचं सलीम खान म्हणाले. 

हे वाचलं का?

सलमान खानला धमक्या देत असलेला लॉरेन्स बिश्नोई जरी बाबा सिद्दीकी प्रकरणात सहभागी असला तरी या प्रकरणाचा आणि सलमान खानचा काहीही संबंध नाही. हा एक पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. तसंच बाबा सिद्दीकी हे सलमानचे चांगले मित्र होते, खूप जुनी मैत्री होती. बाबा सिद्दीकींनी अनेक लोकांना मदत केली होती, मात्र आता काय करू शकतो... असं म्हणत सलीम खान यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

हे ही वाचा >>Baba Siddique : ''मला गोळी लागलीय, मी आता...'', छातीत गोळ्या घुसल्यानंतर सिद्दीकींचे अखेरचे शब्द

 

ADVERTISEMENT

सलीम खान यांना पुढे लॉरेन्स बिश्नोईबद्दल आणखी प्रश्न विचारण्यात आले. "1998 ला झालेल्या हम साथ साथ है चित्रपटाच्या शूटींगदरम्यान काळवीटाची शिकार केली होती, त्यामुळे सलमानने माफी मागावी" अशी मागणी लॉरेन्स बिश्नोईने केली आहे. यावर सलीम खान म्हणाले की, सलमानने कोणत्याही प्राण्याची शिकार केलेली नाही. आम्ही साधं झुरळही मारलं नाही असं म्हणत सलीम खान यांनी मुलावरचे आरोप फेटाळले. "सलमानने मला सांगितलं आहे की मी असं काही केलं नव्हतं, मला त्याने त्यावेळी सांगितलं होतं, तो माझ्याशी खोटं बोलणार नाही, तो प्राणी मारणार नाही, त्याला प्राण्यांवर प्रेम आहे." असं सलीम खान म्हणाले. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT