Sonu Nigam: ठाकरे गटातील व्यक्तींकडून चेंबूरमध्ये धक्काबुक्की? सोनू म्हणाला..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Singer Sonu Nigam attacked : प्रसिद्ध गायक सोनू निगमवर मुंबईतील एका कार्यक्रमात हल्ला करण्यात आला. या घटनेत सोनू निगमसह त्यांच्या जवळची व्यक्ती रब्बानी खान या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणात ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलावर आरोप करण्यात आले आहेत. सोनू निगमने या प्रकरणी सोनू निगमने चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सोनू निगमला धक्काबुक्की करतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतील चेंबूर भागात सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रम आटोपून बाहेर पडत असतानाच सोनू निगमसोबत हा प्रकार घडला. स्टेजच्या पायऱ्यांवरून उतरत असतानाच धक्काबुक्की झाली.

माध्यमांशी बोलताना सोनू निगम म्हणाला की, ‘कुठलीही धक्काबुक्की झालेली नाही. मी पोलिसांत तक्रार दाखल केली, त्याचं कारण असं की, कुणाला तुम्ही सेल्फी वा फोटो घेण्यासाठी जबरदस्ती करता, याबद्दल लोकांनी थोडा विचार करायला हवा. त्यामुळे धक्काबुक्की वगैरे असं घडतं.’

हे वाचलं का?

सोनू निगम म्हणाला की, ‘माझ्यासोबत सेल्फी घेण्याची विनंती केली गेली. पण मी नकार दिला. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने मला पकडलं. नंतर कळलं की ती व्यक्ती आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्पेकर आहे. दरम्यान, मला संरक्षण देण्यासाठी माझ्या जवळचे हरि प्रसाद मध्ये आले. हरि यांना त्याने धक्का दिला. त्यानंतर मला धक्का दिला. त्यामुळे मी खाली पडलो. मला वाचवण्यासाठी रब्बानी आले, तर त्यांनाही धक्का दिला गेला. ते थोडक्यात बचावले. त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेत त्यांचा जीवही गेला असता. रब्बानी यांचं नशीब चांगलं होतं की, खाली लोखंड नव्हतं,’ असं सोनू निगमने सांगितलं.

ADVERTISEMENT

नमाज विरोधात बोलला म्हणून मारहाण?

दरम्यान, सोनू निगमसोबत झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सुमीत ठक्कर यांनी ट्विट करत आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने अजानच्या लाऊड स्पीकरचा मुद्द्यावर सोनू निगम बोलला होता. त्यामुळे मारहाण केल्याचा आरोप केला.

ADVERTISEMENT

अशाच स्वरुपाचं ट्विट मोनिका वर्मा यांनी केलेलं आहे. उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराने इव्हेंटमध्ये सोनू निगमला मारहाण केल्याचं म्हटलं आहे. हे ट्विट खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी रिट्विट करत मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये. चुकीची बातमी दिल्याबद्दल मुंबई पोलीस या हॅण्डलविरोधात गुन्हा दाखल करणार का? असा चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT