Sonam Rai-Khan: ‘मी बिकिनी मॉम बनण्यास तयार, सेक्सी म्हणणं..’, अभिनेत्रीची बेधडक मुलाखत
Sonam Rai-Khan on Sexy Role: अभिनेत्री सोनम राय उर्फ खान बॉलिवूड इंडस्ट्रीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या सोनम तिच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे पात्र शोधत आहे. सोनम आपल्या ड्रीम रोलबद्दल बोलते.
ADVERTISEMENT

Sonam Rai-Khan Bikini Role: मुंबई: बॉलिवूडमध्ये नव्वदच्या दशकात आपल्या ग्लॅमरस अभिनयाने लोकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री सोनम राय (Sonam Rai) हिने सलग सात वर्षांत जवळपास 37 चित्रपटात काम केलं. मात्र, चार वर्षांनंतर सोनमने अचानक इंडस्ट्रीला अलविदाच केला नाही तर देशही सोडला. आज सोनमने 33 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. ती तिच्या पुनरागमन आणि स्वप्नातील भूमिकांबद्दल मोकळेपणाने बोलत असते. (veteran actress sonam rai khan said i am ready to become a bikini mom all set for digital debut said i dont mind doing sexy roles)
आज तक डॉट इनशी बोलताना सोनम म्हणाली, ‘मी माझ्या मनाला स्पर्शून जाईल अशा कामाच्या शोधात आहे. ते काहीही असू शकते, नकारात्मक किंवा सकारात्मक भूमिका, मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे. मला पडद्यावर माझ्याच वयाची भूमिका करायची आहे. मी 51 वर्षांची आहे आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाला आणि संवेदनशीलतेला साजेशी अशीच व्यक्तिरेखा मी करेन. मला अशी भूमिका हवी आहे, ज्याशिवाय कथा पुढे जाऊ शकत नाही.’
सोनमला हवी आहे ‘अशी’ भूमिका
सोनम पुढे म्हणते, ‘मिर्झापूरमधील रसिका दुग्गलच्या भूमिकेने मला खूप प्रभावित केले आहे. मला तिचे काम खूप आवडते. त्या वेब सीरीजमध्ये तिची इतकी दमदार भूमिका आहे की, ती तिथे नसतानाही लोक तिची वाट बघतात. तुमच्याकडे केंद्रीभूत भूमिका नसली तरी तुम्ही त्या छोट्याशा भूमिकेतही जीव आणू शकता, हे तिने सिद्ध केले आहे.’ असं सोनम म्हणाली.
हे ही वाचा >> Gautami Patil: गौतमीच्या कार्यक्रमात तुफान राडा, खुर्च्याची तोडफोड; नेमकं काय घडलं?
मी ‘सेक्सी माँ; बनायलाही तयार…
ओटीटी क्रांतीबाबत सोनम म्हणते, ‘ओटीटीने प्रत्येक सिनेमांची चौकट मोडली आहे. कलाकारांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. मी फक्त OTT मुळे परत येण्याचा निर्णय घेतला आहे. मला हे व्यासपीठ एक्सप्लोर करायचे आहे. मी सर्व प्रकारच्या प्रयोगांसाठी तयार आहे. मी बिकिनी मॉम बनण्यासही तयार आहे. यामध्ये कोणतीही मोठी गोष्ट नाही. जर मी त्यावेळी सेक्सी सोनम असते तर आजही मी सेक्सी सोनम असू शकते. मला सेक्सी म्हणण्यात कधीच वाईट वाटले नाही. मी ते कधीही शिवी म्हणून घेतलेले नाही. जर मला कोणी सेक्सी आईची भूमिका ऑफर केली तर मला आनंद होईल.’