सुझान खान म्हणते, आर्यन चांगला मुलगा, फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी सापडला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा सध्या ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या ताब्यात आहे. याच प्रकरणी कोर्टाने त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे ड्रग्स प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. आता सुझान खान हिने देखील किंग खानला पाठिंबा दिला आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये आर्यनला एक चांगला मुलगा म्हटलं आहे.

सुझान खानचं नेमकं ट्विट काय ?

सुझान खानने शाहरुख खान आणि गौरी खानला पाठिंबा दिला आहे. त्याच्या समर्थनार्थ, सुझानने ट्विट केलं आहे. ज्यात ती म्हणते, ‘मला वाटते की हे आर्यन खानबद्दल नाही. कारण तो दुर्दैवाने चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता. या परिस्थितीकडे एक उदाहरण म्हणून पाहिल्यास आपल्याला दिसून येईल की बॉलिवूडच्या लोकांचं ‘विच हंट’ कसे केले जाते. हे दु:खद आणि अन्यायकारक आहे. कारण तो एक चांगला मुलगा आहे. मी शाहरुख आणि गौरी यांच्या पाठिशी आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसरीकडे, शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जवळचे आणि मित्र हे मन्नतवर येत आहेत. हे सर्व जण या कठीण परिस्थितीत खान कुटुंबीयांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सलमान खान हा पहिल्यांदा शाहरुखच्या घरी जाणारा बॉलिवूडमधील अभिनेता होता. ज्या दिवशी आर्यन खानला अटक करण्यात आली त्याच दिवशी रात्री सलमान खान मन्नतवर गेला होता. सलमान खान व्यतिरिक्त सीमा खान, महिप कपूर, अलविरा अग्निहोत्रीसह अनेक सेलिब्रिटी हे मन्नतवर गेले होते.

आर्यन खानचा खटला हा मुंबईतील हायप्रोफाइल क्रिमिनल वकील सतीश मानशिंदे लढत आहेत. त्यांनीच सलमान खान, संजय दत्त, रिया चक्रवर्ती यांची केस लढवली होती. आर्यन खानने एनसीबीला चौकशीत अनेक गोष्टींची माहिती दिली आहे. आर्यनने वडील शाहरुख खानच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दलही एनसीबीला सांगितले आहे. अटकेनंतर आर्यनला शाहरुखशी लँडलाईन फोनवरुन 2 मिनिटे बोलण्यास परवानगी देण्यात आली होती.

ADVERTISEMENT

ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक; सुप्रिया सुळे म्हणतात…

ADVERTISEMENT

दरम्यान, NCB ला छापेमारी दरम्यान, आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्स आढळून आले नाही. पण यावेळी आर्यनच्या फोनमधून काही आक्षेपार्ह लिंक मिळाल्या असल्याचा दावा ncb ने कोर्टात केला होता. या लिंकद्वारे आंतररष्ट्रीय ड्रग्स सप्लायर्सची माहिती मिळविण्यासाठी आर्यनची कोठडी हवी असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. ज्याला कोर्टाने मंजुरी देत 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT