स्वप्निल जोशीने घेतला हापूस आंब्याचा आस्वाद,तू तेव्हा तशी मालिकेत झाली हापूस पार्टी
Tu tevha tashi series on Zee Marathi won the hearts of the audience

स्वप्निल जोशीने घेतला हापूस आंब्याचा आस्वाद,तू तेव्हा तशी मालिकेत झाली हापूस पार्टी

आंबा म्हणजे सगळ्यांचा जीव कि प्राण आणि याच हापूस आंब्यावर तू तेव्हा तशी या मालिकेतील कलाकारांनी ताव मारला.

झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.

Hapus Mango is what made the actors of this series so hot.
Hapus Mango is what made the actors of this series so hot.

या मालिकेतील हृदयस्पर्शी प्रसंग आणि संवाद देखील प्रेक्षकांना आवडत आहेत. मे महिना म्हणजे उन्हाळा आणि या महिन्यात आगमन होतं ते म्हणजे फळांचा राजा आंबा याचं. आंबा म्हणजे सगळ्यांचा जीव कि प्राण आणि याच हापूस आंब्यावर तू तेव्हा तशी या मालिकेतील कलाकारांनी ताव मारला.

Viewers will get to see Hapus party in 'Tu tevha tashi' series
Viewers will get to see Hapus party in 'Tu tevha tashi' series

प्रेक्षकांना या मालिकेत हापूस पार्टी होताना पाहायला मिळणार आहे आणि इतकंच नव्हे तर अनामिकाकडे होणाऱ्या हापूस पार्टीमध्ये सौरभ रमा आजीला अनामिकावर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली देखील देणार आहे आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त करणार आहे. सौरभ आता त्याच्या मनातील गोष्ट अनामिकाला सांगणार की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. हापूस प्रमाणेच गोड अशी सौरभ आणि अनामिकेच्या प्रेमाची सुरुवात होणार का? हे प्रेक्षकांना मालिकेत लवकरच पाहायला मिळेल

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in