VIDEO: …अन् पुण्यात बावऱ्या बैलापुढे थिरकली गौतमी पाटील!
पुण्यातील मुळशीमध्ये चक्क एका बैलासमोर गौतमी पाटीलच्या डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहा याचा खास Video.
ADVERTISEMENT

पुणे: ‘पुणे तिथं काय उणे…’ या म्हणीचा प्रत्यय आता पुन्हा एकदा आला आहे. ते देखील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) खास कार्यक्रमामुळे.. त्याचं झालं असं की, पुण्याच्या मुळशीत विवाहच्या हळदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण हा कार्यक्रम चक्क एका बैलाच्या समोर सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी बावऱ्या बैल गौतमीच्या स्टेजच्या समोर बांधला होता आणि त्यापुढे गौतमी नृत्य सादर करत होती. मुळशीतील सुशील राजाभाऊ हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता. (video gautami patils dance program was organized in front of a bull in pune)