विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त सावरकर सिनेमाचं पोस्टर रिलीज, रणदीप हुडा सावरकरांच्या भूमिकेत

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत सिनेमाचे पहिले पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त सावरकर सिनेमाचं पोस्टर रिलीज, रणदीप हुडा सावरकरांच्या भूमिकेत
Randeep Hooda unveils the poster of 'Swatantra Veer Savarkar' on Savarkar Jayanti

Randeep Hooda- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची २८ मे रोजी जयंती आहे. त्यानिमित्त देशभरात अनेक व्याख्यानं आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरम्यान शनिवारी एका नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत सिनेमाचे पहिले पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. दरम्यान तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सिनेमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका कोणता अभिनेता साकारत आहे. तर वीर सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी महेश मांजरेकर यांनी तेवढ्याच ताकदीचा अभिनेता निवडला आहे.

महेश मांजरेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा देत या सिनेमात रणदीप हुड्डा (Randeep Hooda)असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी हे पोस्टर शेअर करताना असे म्हटले आहे की, 'सावरकरांबद्दल लोकांच्या मनात वेगवेगळ्या आवृत्त्या असू शकतात पण एक चित्रपट निर्माता म्हणून पण मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखा यात सावरकर जसे होते, आहेत आणि राहतील यापेक्षा काही फरक असणार नाही. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांना विसरता येणार नाही.'

Randeep Hooda unveils the poster of 'Swatantra Veer Savarkar' on Savarkar Jayanti
Randeep Hooda unveils the poster of 'Swatantra Veer Savarkar' on Savarkar Jayanti

अभिनेता रणदीप हुड्डा याने देखील सावरकर जयंतीच्या शुभेच्छा देत सिनेमाचे पहिलेवहिले पोस्टर शेअर केले आहे. त्याने यामध्ये असे म्हटले आहे की, 'भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या आणि आत्म-वास्तविकतेच्या लढ्यातील सर्वोच्च पण ज्यांच्याबाबत खूप कमी ऐकिवात आहे अशा वीरांपैकी असणाऱ्याला हा सलाम आहे. मला आशा आहे की एका खर्‍या क्रांतिकारकाची भूमिका करण्याचे आव्हान मी पेलू शकेन आणि त्यांची खरी कहाणी सांगू शकेन जी दीर्घकाळासाठी दडवून ठेवली गेली होती.' दरम्यान रणदीप हुड्डाच्या पहिल्या लुकचे जेवढे कौतुक होत आहे, तेवढेच ही भूमिका स्विकारल्याने त्याच्यावर टीका देखील केली जात आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in