संतूरचे सूर अखेर थांबले, जागतिक किर्तीचे संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला संगीताच्या दरबारात शर्मा यांनी मानाचे स्थान मिळवून दिले.
संतूरचे सूर अखेर थांबले, जागतिक किर्तीचे संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

Pandit Shivkumar Sharma passes away जागतिक कीर्तीचे संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. १० मे रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचे योगदान मोठे आहे. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला संगीताच्या दरबारात शर्मा यांनी मानाचे स्थान मिळवून दिले. शिवकुमार यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली.

‘सिलसिला ,डर ’ या बॉलिवूड सिनेमांना पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर पं. शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे. ‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही त्यांची ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामध्ये पं. हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केले होते.

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधानानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.