Supreme Court: स्लट, भारतीय नारी, House Wife.. ‘या’ शब्दांवर का आली बंदी?
महिलांसंबंधी 43 आक्षेपार्ह शब्दांवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजात वापरायला बंदी आणली आहे. पाहा असे नेमके कोणते शब्द आहेत.
ADVERTISEMENT

Supreme Court Handbook Women Words: मुंबई: Prostitute, Slut, Affair, Housewife, Indian woman / western woman हे आणि असे असंख्य शब्द एखाद्या महिलेला टोचून बोलण्यासाठी, तिला कमी लेखण्यासाठी, तिला अपमानित करण्यासाठी अगदी सहजपणे आणि कोणताही विचार न करता आपल्या समाजात वापरले जातात. या आणि अशा 43 शब्दांवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजात वापरायला बंदी आणली आहे. या शब्दांचे अर्थ जर तुम्हाला माहित नसतील तर शोधायलाही जाऊ नका.. कारण त्याने केवळ स्त्रीचा अपमान होतो असं नाही, तर हे शब्द वापरणाऱ्याच्या वैचारिक दिवाळखोरीचंही दर्शन घडतं. (affair housewife indian woman western 43 words banned from use in judicial proceedings by supreme court )
असो, देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतलेल्या या निर्णयामध्ये नेमकं काय-काय आहे? आणखीन कोण-कोणते शब्द वापरण्यावर बंदी आली आहे आणि का? हेच समजून घेऊयात.
सर्वोच्च न्यायालयाने 30 पानांची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे, ज्याचं नाव आहे combating gender stereotypes. हे मार्गदर्शिका कलकत्ता हायकोर्टाच्या न्यायमूर्ती मौसमी भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलं आहे. या समितीत निवृत्त न्यायमूर्ती प्रभा श्रीदेवन, न्यायमूर्ती गीता मित्तल, प्रोफेसर झूमा सेन देखील होत्या. महिलांप्रति असभ्य, अशोभनीय, त्यांचा अवमान होईल, त्यांना कमी लेखलं जाईल अशा शब्दांऐवजी या मार्गदर्शिकामध्ये पर्यायी शब्द देण्यात आले आहेत.
त्यातील काही महत्वाचे आणि अगदी सर्रासपणे वापरले जाणारे शब्द आम्ही तुम्हाला सांगू, काही सांगणं उचित ठरणार नाही.










