Mazi Ladki Bahin Yojana: 1500 रु. जमा पण झाले, तुम्ही कसली पाहताय वाट? 'असा' भरा अर्ज...
Mazi Ladki Bahin Yojana Form Submission: माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहे. मात्र अद्याप अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले नाही. जाणून घ्या नेमका अर्ज कसा भरायचा.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडकी बहीण योजनेचा अर्ज नेमका कसा करायचा?
पाहा ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज कसा भरता येईल
सरकारकडू 1500 रुपये देण्यास सुरुवात
Mazi Ladki Bahin Yojana Online Apply: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे आता थेट महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळे आता योजनेला बराच प्रतिसाद मिळत आहेत. आतापर्यंत दीड कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, अद्यापही अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले नाहीत. पण अद्यापही वेळ गेलेली नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे अद्याप काही काही दिवस शिल्लक आहेत. (1500 rs deposited in women bank accounts how to apply mazi ladki bahin yojana online from the official website)
ADVERTISEMENT
दरम्यान, माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज कसा भरायचा आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रं कोणती आहेत. हे आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
अधिकृत वेबसाइटवरून Mazi Ladki Bahin Yojana Online Apply कसं करावं?
- सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.
- यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर सुरू होईल.
- वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला अर्जदार लॉगिनच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज उघडेल.
- आता या पेजवर तुम्हाला Doesn’t have account Create Account? असं दिसेल. तुम्हाला पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही क्लिक करताच, तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडेल.
- आता तुम्हाला या पेजवर तुमचे नाव, मोबाइल नंबर, पासवर्ड, जिल्हा, तालुका, गाव महानगरपालिका, अधिकारी व्यक्ती इत्यादी आवश्यक माहिती टाकावी लागेल.
- यानंतर तुम्हाला नियम आणि अटी स्वीकारून कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- कॅप्चा कोड टाकल्यानंतर, तुम्हाला Signup पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमची पोर्टलवर नोंदणी होईल. ज्यानंतर तुम्हाला पासवर्ड मिळेल.
- लॉगिन करण्यासाठी तुम्हाला पुन्हा लॉगिन पेजवर यावे लागेल आणि तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड एंटर करावा लागेल.
- यानंतर तुम्हाला दिलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि Login पर्यायावर क्लिक करावं लागेल.
- तुम्ही क्लिक करताच वेबसाइटचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडेल. जिथे तुम्हाला Mazi Ladki Bahin Yojana Application Form पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही क्लिक करताच तुमच्यासमोर अर्ज उघडेल.
- तुम्हाला तुमचे नाव, पती/वडीलांचे नाव, वैवाहिक स्टेट्स, जिल्हा, बँकेचे नाव, खातेदाराचे नाव, खाते क्रमांक इत्यादीसारख्या अर्जामध्ये विचारलेली माहिती द्यावी लागेल.
- सर्व तपशील भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- यानंतर, तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र आणि फोटो अपलोड करावा लागेल आणि Accept हमीपत्र डिस्क्लेमरच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- शेवटी तुम्हाला Submit पर्यायावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही अधिकृत वेबसाइटद्वारे माझी लाडकी बहीण योजनेसाठी यशस्वीरित्या ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF: माझी लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रातील 10 Tick आहेत तरी काय?
नारीशक्ती दूत App वरून असा भरा अर्ज / Maharashtra Nari Shakti App Login
स्टेप 1: सर्वात अगोदर नारीशक्ती दूत हे अॅप आपल्याला गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करावं लागेल. हे अॅप डाऊनलोड केल्यावर ते ओपन करा. अॅप सुरू केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर 'नारीशक्ती दूत ह्या APP मध्ये आपले स्वागत आहे.' असा मेसेज दिसेल
स्टेप 2: यानंतर तीन स्लाइड पुढे जाऊन Done या बटणावर क्लिक करा. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर I Accept या बटणावर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन या बटणावर क्लिक करा.
ADVERTISEMENT
स्टेप 3: लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या अॅपमध्ये तुमचं प्रोफाइल तयार करावं लागेल. ज्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, इमेल-आयडी ही माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा. त्यानंतर तुमचं प्रोफाइल अपडेट करा. त्यानंतर योजना या पर्यायावर क्लिक करा.
ADVERTISEMENT
स्टेप 4: यानंतर माझी लाडकी बहीण या योजनेचं हमीपत्र डाऊनलोड करा. त्यानंतर मुख्य पेजवर या. जिथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करा.
स्टेप 5: त्यानंतर इथे महिलेचे नाव टाकायचं त्यानंतर महिलेच्या वडील किंवा पतीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीख निवडताना हे सुनिश्चित करा की अर्जदार महिलेचं वय हे 21 ते 65 या दरम्यान असायला हवं.
स्टेप 6: त्यानंतर तुम्हाला पुढे जिल्हा, गाव/शहर हे निवडावं लागेल. तसंच तुमचं स्थानिक स्वराज्य संस्था जी असेल ती निवडावी. पुढे पिनकोड आणि तुमचा पत्ता ही माहिती भरा. तसंच यासोबत मोबाइल नंबरही टाकावा लागेल.
स्टेप 7: पुढे तुम्हाला अशी माहिती विचारण्यात येईल की, तुम्हाला शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळतोय का याबाबत विचारणा करण्यात येईल. मिळत असेल तर हो यावर क्लिक करा. नसेल मिळत तर नाही यावर क्लिक करा.
स्टेप 8: यानंतर तुमच्या बँकेशी संबंधित माहिती भरा. ज्यामध्ये बँकेमध्ये तुमचे जे पूर्ण नाव आहे ते भरा. तसंच तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोडही भरा.
स्टेप 9: यानंतर तुम्हाला काही कागदपत्रं अपलोड करावी लागतील. ज्यामध्ये तुम्हाला आधारकार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा त्याऐवजी पिवळे/केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक हे कागदपत्र अपलोड करावी लागतील. त्यानंतर अर्जदाराचा फोटो जोडावा लागेल.
स्टेप 10: त्यानंतर Accept हमीपत्र डिसक्लेमर या बॉक्समध्ये टीक करा. त्यानंतर माहिती सादर करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा अर्ज सब्मिट करा.
हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana In Review Problem: माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फक्त 2 मिनिटांत होईल मंजूर, फक्त...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पीडीएफ अर्ज कसा भरायचा?
- पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते. पण, ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील.
- भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर पोच पावती दिली जाईल.
- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल. त्यासाठी महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे शिधा पत्रिका (रेशन कार्ड) आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
क्लिक करू अर्ज डाऊनलोड करा... View PDF
हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Aadhaar Card: 'ही' चूक असेल तर 1500 रुपये विसरा, चटकन 'हा' करुन घ्या बदल!
रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर कोणती कागदपत्रे द्यावी लागणार?
1) ऑनलाईन अर्ज
2) आधार कार्ड
3) महाराष्ट्रात असल्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, जन्म दाखला.
4) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
5) बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
6) पासपोर्ट आकाराचा फोटो
7) शिधा पत्रिका (रेशन कार्ड)
8) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT