1st January 2025 Horoscope In Marathi: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पडणार पैशांचा पाऊस! 'या' राशीचे लोक होतील मालामाल
1st January 2025 Horoscope: ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक स्वामी असतो, ज्याचा सर्व राशींवर प्रभाव असतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोणत्या राशीचे लोक होतील प्रचंड श्रीमंत?

या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

या राशीचे लोक शैक्षणिक कार्यात होतील यशस्वी
1st January 2025 Horoscope: ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक स्वामी असतो, ज्याचा सर्व राशींवर प्रभाव असतो. ज्योतिष गणनेनुसार, 1 जानेवारीचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. तर काही राशींसाठी सामान्य स्वरुपाचा राहणार आहे. 1 जानेवारी 2025 ला कोणत्या राशींना लाभ होणार आहे आणि कोणत्या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
मेष राशी
वादविवादांपासून दूर राहा. कुटुंबात शांतता ठेवा. आईला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
वृषभ राशी
खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचं सहकार्य मिळेल. खूप जास्त खर्च होईल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतील. धार्मिक कार्यात वाढ होईल.
मिथुन राशी
शैक्षणिक कार्यात समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांना मेहनत घ्यावी लागेल. प्रवासाचा योग येऊ शकतो. कुटुंबात मांगलिक कार्य होतील. मित्रांचं सहकार्य मिळेल.