अब्दुल कलामांचं मिशन फसलं पण, सतीश धवन यांनी घेतली जबाबदारी! नेमकं काय घडलं?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

SLV-3 Satellite Mission Failed Story : भारताची चांद्रयान-3 मोहीम इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली. पी. वीरामुथुवेल हे इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेचे संचालक आहेत. आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरतोय. पी. वीरमुथुवेल आणि त्यांच्या टीमच्या मेहनतीचे हे फळ आहे. गुरूवारी (23 ऑगस्ट 2023) रोजी संध्याकाळी 6.04 वाजता, चांद्रयानचे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. (Abdul Kalam’s SLV-3 Satellite Mission failed but Satish Dhawan took responsibility What exactly happened)

ADVERTISEMENT

मिशनच्या यशाचे पहिले श्रेय वीरमुथुवेल आणि त्यांच्या टीमला जाईल. असाच एक किस्सा भारताचे मिसाइल मॅन आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी संबंधित आहे. जेव्हा त्यांची आणि त्यांच्या टीमच्या एका मिशनच्या अपयशाची जबाबदारी इस्रोचे तत्कालीन प्रमुख सतीश धवन यांनी घेतली होती. 1979 साली कलाम हे भारताच्या SLV-3 सॅटेलाइट मिशन प्रकल्पाचे व्यवस्थापक होते. मिशन अयशस्वी झाले. हे सॅटेलाइट बंगालच्या उपसागरात पडले होते.

Supriya Sule : ‘118 जागा लढल्यावर…’, दिलीप वळसे पाटलांवर सुळेंचा पलटवार

यावेळी इस्रोचे मुख्य शास्त्रज्ञ सतीश धवन होते. ज्यांच्या नावाने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे सतीश धवन अंतराळ केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सतीश धवन यांनी त्यावेळी कलाम आणि त्यांच्या टीमवर विश्वास दाखवला होता आणि मिशनच्या अपयशाची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. पुढच्या वेळी जेव्हा हे मिशन दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले तेव्हा त्यांनी कलाम यांना पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी पाठवले.

हे वाचलं का?

एपीजे अब्दुल कलाम यांनी स्वतः सांगितला किस्सा…

कलाम यांनी फिलाडेल्फिया येथील व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक फोरममध्ये मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी भारताच्या भवितव्यासाठीच्या त्यांच्या व्हिजनबद्दल सांगितलं. तसंच इतर अनेक मुद्द्यांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही तुमच्या अनुभवाच्या आधारे उदाहरण देऊ शकता का? की एखाद्या नेत्याने अपयश आल्यावर गोष्टी कशा हाताळायच्या.

या प्रश्नावर अब्दुल कलाम म्हणाले होते, ‘माझ्या अनुभवाच्या आधारे 1973 मध्ये, मी भारताच्या सॅटेलाइट लॉन्च व्हीकल प्रोग्रामचा प्रकल्प संचालक झालो. त्याला सामान्यतः SLV-3 असे म्हणतात. भारताच्या ‘रोहिणी’ सॅटेलाइटला कक्षेत आणणे हे आमचे ध्येय 1980 पर्यंत होते. मला यासाठी निधी आणि इतर संसाधने देण्यात आली होती. परंतु हे स्पष्टपणे सांगण्यात आले होते की सॅटेलाइटला 1980 पर्यंत अंतराळात प्रक्षेपण करायचं आहे. यासाठी हजारो लोकांनी वैज्ञानिक आणि तांत्रिक टीममध्ये एकत्र काम केले.’

ADVERTISEMENT

भयंकर! 3 वर्षाच्या चिमुकल्याच्या डोळ्यात किडा घुसला, ऑपरेशननंतर डॉक्टरही चक्रावले

कलाम पुढे म्हणाले की, ‘1979 मध्ये ऑगस्टचा महिना होता. आम्हाला वाटलं की आम्ही तयार आहोत. प्रकल्प संचालक म्हणून मी प्रक्षेपणासाठी नियंत्रण केंद्रात गेलो. सॅटेलाइट प्रक्षेपणाच्या चार मिनिटं आधी, मी कॉम्प्युटरवर आवश्यक असलेल्या वस्तूंची चेकलिस्ट पाहत होतो. जे तपासण्याची गरज होती. रिझर्व्हमध्ये पुरेसे इंधन होते म्हणून मी कॉम्प्युटरला बायपास केलं आणि मॅन्युअल मोडवर स्विच केलं आणि रॉकेट लाँच केलं. पहिल्या टप्प्यात सर्व काही ठीक झालं. दुसऱ्या टप्प्यात, एक समस्या उद्भवली. सॅटेलाइट कक्षेत जाण्याऐवजी, संपूर्ण रॉकेट यंत्रणा बंगालच्या उपसागरात पडली. हे एक मोठं अपयश होतं.’

ADVERTISEMENT

मिशन अयशस्वी झाल्यानंतर काय घडलं?

यावर एपीजे अब्दुल कलाम स्पष्ट म्हणाले, ‘त्या दिवशी इस्रोचे अध्यक्ष प्रोफेसर सतीश धवन यांनी पत्रकार परिषद बोलावली. प्रक्षेपणाची वेळ सकाळी 7.45 मिनिटांची होती. श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या सॅटेलाइट प्रक्षेपणस्थळी जगभरातील पत्रकार जमले होते. प्रोफेसर धवन हे इस्रोचे प्रमुख होते. त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली. त्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली.

ते म्हणाले की, ‘टीमने खूप मेहनत घेतली होती. पण अजून तांत्रिक सहाय्याची गरज आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना आश्वासन दिले की, पुढच्या वर्षी टीम नक्कीच यशस्वी होऊन दाखवेल. मी प्रकल्प संचालक होतो. हे माझे अपयश आहे. असे असतानाही त्यांनी इस्रोचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली.’

Wagner Chief vs Vladimir Putin: प्रिगोझिनला विमानतच संपवलं, पुतीन यांनी मित्र आणि शत्रूचा ‘असा’ काढला काटा!

पुढच्या वर्षी सॅटेलाइट मिशन यशस्वी!

एपीजे अब्दुल कलाम म्हणाले, ‘पुढच्या वर्षी जुलै 1980 मध्ये आम्ही पुन्हा सॅटेलाइट प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आम्हाला यश मिळाले. संपूर्ण देश उत्साहात होता. पुन्हा पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रोफेसर सतीश धवन यांनी मला बाजूला बोलावून सांगितलं, आज तुम्ही पत्रकार परिषदेला संबोधित करा.’

कलाम यांच्या मते, त्यादिवशी त्यांना धडा मिळाला. यश मिळाल्यावर त्यांनी याचे श्रेय आपल्या टीमला दिले. एपीजे अब्दुल ते म्हणाले की, त्यांना हा व्यवस्थापनाचा अनुभव कोणत्याही पुस्तकातून नाही, तर प्रत्यक्ष जीवनातून मिळाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT