Mazi Ladki Bahin Yojana: पटकन अर्ज भरा... माझी लाडकी बहीण योजनेचे थोडेच दिवस शिल्लक!
Mazi Ladki Bahin Yojana apply date: माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 ही आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याआधी महिलांना अर्ज दाखल करावे लागतील.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी काहीच दिवस शिल्लक
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज ऑनलाइनही करता येणार
माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये
Mazi Ladki Bahin Yojana apply last date: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक महिला यासाठी अर्ज करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्षांमधील महिलांना सरकार प्रतिमहा 1500 रुपये देणार आहेत. पण यासाठी महिलांना अर्ज दाखल करून नोंदणी करावी लागणार आहे. मात्र, आता या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांना थोडी घाई करावी लागणार आहे. कारण अर्ज करण्यासाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. (apply quick few days left for mazi ladki bahin yojana last date is 31st august 2024)
ADVERTISEMENT
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यभरात अनेक शासकीय कार्यालयांमध्ये महिलांची अक्षरश: झुंबड उडाली होती. सुरुवातीला हे अर्ज केवळ ऑफलाइन पद्धतीने भरता येत होते. मात्र, आता हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने देखील भरता येणार आहे. यासाठी शासनाने अॅप देखील लाँच केलं आहे. यामुळे अर्ज भरणं हे सोप्पं झालं आहे. मात्र, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज भरणं आवश्यक आहे.
हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana : चुका टाळा! 1500 रुपये मिळवण्यासाठी कसा भरायचा अर्ज?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत महिलांना अर्ज करावे लागणार आहेत. या योजनेला महिलांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन सरकारने सुधारित जीआर काढून अर्जाची तारीख वाढवली होती.
हे वाचलं का?
सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 जुलै ते 15 जुलै अशी होती. मात्र, सुधारित जीआरनुसार ही तारीख आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. यामुळे राज्यातील महिलांना योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. तसेच सरकारकडून योजनेचे काही नियम देखील बदलण्यात आले आहेत.
हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana List: 1500 रुपये मिळणार की नाही? असं तपासा यादीत तुमचं नाव!
संपूर्ण राज्यात जुलै 2024 पासून माझी लाडकी बहीण योजना ही लागू करण्यात आली आहे. आता ऑनलाइन अर्जही करता येणार असल्याने महिलांना कोणत्याही शासकीय कार्यालयात देखील जाण्याची गरज नाही.
ADVERTISEMENT
योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा:
सदर योजनेत आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31. ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.
ADVERTISEMENT
माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती
योजना कधी सुरू झाली - |
28 जून 2024 |
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कधी सुरू झाली- |
1 जुलै 2024 |
आधी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय होती- |
15 जुलै 2024 |
जुने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे - |
31 ऑगस्ट 2024 |
पैसे कधीपासून मिळणार - |
सप्टेंबर 2024 पासून |
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT