Diwali 2023 Muhurat: दिवाळी, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कधी? पण प्रदोष काळात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

diwali 2023 date saubhagya yoga swati nakshatra diwali ganesh lakshmi puja muhurat nishita kaal shubh samay
diwali 2023 date saubhagya yoga swati nakshatra diwali ganesh lakshmi puja muhurat nishita kaal shubh samay
social share
google news

Diwali 2023 : दिवाळी ही कार्तिक अमावस्या तिथीला साजरी केली जाते. दिवाळीच्या काळात लक्ष्मी आणि भगवान गणेशाचीही पूजा केली जाते. तर सूर्यास्तानंतर प्रदोष (Pradosh) कालावधी सुरू होतो. दिवाळीत निशिता मुहूर्तावरही लक्ष्मीची पूजा (Laxmi Pooja) केली जात असते. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा (Dr. Ganesh Mishra) यांच्या मते, यावर्षी दिवाळीत आयुष्मान आणि सौभाग्य (Ayushman and Saubhagya) नावाचे दोन शुभ योग आले आहेत. तर त्याच दिवशी स्वाती आणि विशाखा नक्षत्रही (Vishakha Nakshtra) आहेत. त्यामुळे जाणून घेऊया यंदाची दिवाळी कधी आहे? आणि दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त नेमका कोणता आहे?

प्रदोष काल अमावस्या

पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या रविवार 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.44 पासून सुरू होणार आहे. तर सोमवारी 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2. 56 पर्यंत चालू राहणार आहे. उदयतिथीच्या आधारे कार्तिक अमावस्या 13 नोव्हेंबर रोजी असणार आहे. मात्र प्रदोष काल अमावस्या 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 13 नोव्हेंबरला प्रदोष काळाच्या वेळी असणार आहे. त्यामुळेच यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे.

हे ही वाचा >> रेव्ह पार्टी, सापांचं विष.. ‘वर्षा’वर आरती करणारा एल्विश यादव नेमका कोण?

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबरला सूर्यास्त संध्याकाळी 5.29 वाजता होणार आहे. या परिस्थितीत संध्याकाळी 5.29 पासून प्रदोष काल सुरू होणार आहे. दिवाळीच्या प्रदोष काळात लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5.39 ते 7.35 पर्यंत असतो. तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी संध्याकाळी 1 तास 56 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळणार आहे. दिवाळीचा प्रदोष काल हा संध्याकाळी 5.29 ते रात्री 8.08 पर्यंत असतो, तर वृषभ काल संध्याकाळी 5.39 ते 7.35 पर्यंत असतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

निशिता काल

या वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा निशिता मुहूर्त रात्री 11:39 ते 13:32 पर्यंत आहे. तर लक्ष्मीपूजनाचा निशिता मुहूर्ताचा कालावधी 53 मिनिटे असणार आहे. त्या वेळी सिंह राशीची रास सकाळी 12.10 ते 2.27 पर्यंत असते. दिवाळीत निशिता काल मुहूर्तावर अनेक लोकं लक्ष्मी मंत्रांचे पठण करतात.

स्वाती नक्षत्रात लक्ष्मीपूजन

यावेळी दिवाळीतील लक्ष्मीपूजन सौभाग्य योग आणि स्वाती नक्षत्रात असणार आहे. दिवाळीत सकाळपासून दुपारी 4.25 पर्यंत आयुष्मान योग असतो, तर त्यानंतर सौभाग्य योग सुरू होणार आहे. जो दुसऱ्या दिवशी दुपारी 3.23 पर्यंत असणार आहे. हे दोन्हीही शुभ योग आहेत. तर स्वाती नक्षत्र हे सकाळपासून रात्रीपर्यंत असते. स्वाती नक्षत्र 13 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.51 वाजता समाप्त होईल आणि विशाखा सुरू होईल. धार्मिकतेनुसार दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मी, श्रीगणेश आणि धनाची देवता भगवान कुबेर यांची पूजा केल्याने सुख, ऐश्वर्य, वैभव आणि समृद्धी वाढते. तर वर्षभर लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळून आर्थिक संकट दूर होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> रेव्ह पार्टी, सापांचं विष.. ‘वर्षा’वर आरती करणारा एल्विश यादव नेमका कोण?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT