Chanakya Niti: अपयशाला घाबरू नका, चाणक्याचा युक्तीच्या 5 गोष्टी बदलून टाकतील आयुष्य

मुंबई तक

आयुष्य म्हटले की यश अपयश येतेच मात्र कोणतेही यश मिळवायचे असेल तर त्यासाठी कष्टही तेवढेच करावे लागतात. मात्र त्याला जर चाणक्य नीतिची जोड मिळाली तर मात्र आयुष्यातील अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटत असतात.

ADVERTISEMENT

Five things Acharya Chanakya said if you fail despite trying
Five things Acharya Chanakya said if you fail despite trying
social share
google news

Chanakya Niti: आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते मात्र यशाचा मार्ग म्हणावा तितका सोपा नसतो. त्यासाठी तुम्हाला कोणता ना कोणता त्याग करावाही लागत असतो. त्यामुळे कधी कधी तुम्हाला तुमच्या अपयशला (failure) सामोरे जाण्यासाठीही तयार रहावे लागत असते. कारण अनेकदा तुमच्या वागण्यातही (behavior) काही गोष्टी असतात, त्या गोष्टीच तुम्हाला तुमची कमतरता दाखवून देत असतात मात्र त्या तुम्हाला त्या त्या वेळी जाणवत नाहीत. त्यामुळे त्या गोष्टीच तुमच्या आयुष्यात येणाऱ्या यशात त्या काटा बनत असतात. त्यामुळे जीवनात काही साध्य करायचे असेल तर आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा.

अपयशातून धडा घ्या

यशस्वी लोकांकडून धडा घेण्यापेक्षा अयशस्वी लोकांकडून जास्त शिकण्यासारखे असते. कारण यशस्वी लोकं अयशस्वी लोकांच्या चुकांमधूनच शिकत असतात. प्रत्येकजण आपल्याला जीवनात कसे असावे हे सांगतो, मात्र कसे असू नये हे मात्र कोणीच सांगत नाही. जे आयुष्यात काहीच करू शकले नाहीत त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केले ज्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत हे सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

ध्येयापासून हटू नका

तुमचे लक्ष तुमच्या ध्येयावर नेहमी लक्ष केंद्रित करा, कारण वाईट काळ म्हणजेच तुम्हाला आयुष्यातील कोणत्याही वळणावर तो तुम्हाला भेटू शकतो. आपला सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपले विचलित होणारे विचार. त्या कारणांमुळेच अनेक लोकं त्यांच्या त्यांच्या त्या यशापासून दूर जातात. तुम्ही लक्ष विचलित होऊ दिलं नाही तर तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहचू शकता.

शरीराला चांगली सवय लावा

जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला स्वादिष्ट अन्न आणि शांत झोप या गोष्टींपासूनही तुम्हाला दूर राहावे लागणार आहे. कारण तो तुमचा क्षणिक आनंद तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. कारण तुमचे शरीर इतकेही आरामदायक बनवू नका, कारण तेच तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरु शकते. तुमच्या शरीराला नेहमी विश्रांतीची सवय लागली तर मात्र तिच तुमच्या यशाच्या अडथळा ठरू शकते.

हे वाचलं का?

    follow whatsapp