Gold Purity : अस्सल बावनकशी सोनं कसं ओळखतात? समजून घ्या…

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

If you Are Buying Gold Get Know About its Purity and karat
If you Are Buying Gold Get Know About its Purity and karat
social share
google news

How to Find Purity of Gold : ‘असली सोने की परख सिर्फ एक जौहरी ही कर सकता है!’ अशी हिंदी भाषेत एक म्हण आहे. पण असं नाही आहे. आता तुम्हीपण सोन्याची शुद्धता (Gold Purity) सहज पारखून ओळखू शकता. सर्वात शुद्ध सोने 24 कॅरेट मानले जाते. मात्र, सोन्याचे दागिने (Gold Jewellery) बनवण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर केला जात नाही. सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 18 आणि 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत वेगळी आहे. अशा परिस्थितीत तुमचे सोने किती शुद्ध आहे हे शोधणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. (If you Are Buying Gold Get Know About its Purity and karat)

सोन्याची शुद्धता कशी ओळखली जाते?

दागिने शुद्ध आहेत की नाही हे ओळखण्याचा एक सोपा मार्ग आहे. हॉलमार्क चिन्हांद्वारे दागिन्यांची शुद्धता ओळखता येते. ते एका कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंत असते. आता प्रश्न पडतो की कॅरेट म्हणजे काय?

वाचा : Maharashtra Politics : खैरे-दानवेंनी वाढवला ठाकरेंचा ताण, मातोश्रीवरील बैठकीत काय झालं?

कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता ओळखण्यासाठी कॅरेटचा वापर केला जातो. 22 कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी वापरले जाते. त्यात 916 लिहिलेले असेल. 24 कॅरेट सोने हे शुद्ध सोने मानले जाते. त्यावर 999 असे लिहिलेले असेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

21 कॅरेटच्या दागिन्यांवर 875 लिहिलेले असते. तर, 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिलेले असते. जर 14 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 585 लिहिलेले असते.

24 कॅरेट आणि 18 कॅरेटमध्ये फरक काय?

22 कॅरेट सोन्यामध्ये 91.67 टक्के शुद्ध सोने असते, तर उर्वरित 8.33 टक्के इतर धातू असतात. त्याच वेळी, 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोने असते. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोने असते आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.5 टक्के शुद्ध सोने असते.

ADVERTISEMENT

वाचा : नवऱ्याचं गुप्तांगच कापलं अन् टॉयलेटमध्ये जाऊन…बायकोचं भयंकर कृत्य

सणासुदीत सोन्याची मागणी आणि किंमती का वाढतात?

सणासुदीच्या काळात सोने खरेदी शुभ मानले जाते. यामुळे सोन्याची मागणी आणि त्याच्या किंमती प्रचंड वाढतात.

ADVERTISEMENT

24 कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी वापरले जात नाही. तर, सोन्याचे बार किंवा सोन्याचे नाणे बनवण्यासाठी ते वापरले जाते. सोन्याचे दागिने फक्त 18 किंवा 22 कॅरेट सोन्यापासून बनवले जातात.

वाचा : Satara Crime : कर्करोगाच्या भीतीपायी पोटच्या पोरालाच संपवलं, साताऱ्यात काय घडलं?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आणखी सोपे मार्ग कोणते?

तुमचे सोने खरे आहे की खोटे हे जाणून घेण्यासाठी आणि सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी तुम्ही फक्त हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करावेत. भारत सरकारने सर्व सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे बंधनकारक केले आहे. तुमच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग नसेल तर ते दागिने खरेदी करू नका.

तसंच, सोने हा चुंबकीय नसलेला धातू आहे तर, इतर बहुतेक धातूंमध्ये चुंबकीय गुणधर्म असतात. यामुळे जर तुम्ही चुंबकाजवळ खरे सोने ठेवले तर तुमचे सोने चुंबकाला चिकटणार नाही. सोन्याचे कॅरेट जितके कमी असेल तितके ते अधिक चिकटेल. १० कॅरेटपेक्षा कमी वजनाचे सोने अशुद्ध मानले जाते.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT