Ladki Bahin Yojana : दुसऱ्या टप्प्यात 52 लाख महिलांना मिळणार लाभ, तुमच्या बँकेत किती पैसे येणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme 52 lack women bank account 3000 rs deposite dbt transfer mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde
दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणाचा कार्यक्रम शनिवारी पार पडला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सुरुवात

point

दुसऱ्या टप्प्यात 52 लाख महिलांना मिळणार लाभ

point

कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येणार?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात (Second Term) महिलांच्या खात्यात (Bank Account) पैसे पाठवायला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात तब्बल 52 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होणार आहेत. या सदंर्भातला दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणाचा कार्यक्रम शनिवारी पार पडला आहे. आता या दुसऱ्या टप्प्यात कुणाला लाभ मिळणार आहे? कुणाच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme 52 lack women bank account 3000 rs deposite dbt transfer mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde)   

नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांनी आताच बँक खाते चेक करायला सुरूवात करा. 

हे ही वाचा : Rahul Gandhi : ''भाजपनेच या बदमाशांना...'', वृद्धाला मारहाण झाल्याच्या घटनेवर राहुल गांधी कडाडले!

लाडकी बहीण योजनेत या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल 52 लाख महिलांच्या खात्यात आज (दि. 31) जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यासाठीचे एकूण 3 हजार रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.त्यामुळे आता महिलांच्या खात्यात हळुहळू पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ज्या महिलांचे अर्ज हे ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात सरकारने पैसे पाठवायला सुरूवात केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या महिलांनी आताच खाते तपासायला सुरूवात करा. जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर ते येत्या दोन ते तीन दिवसात जमा होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Pink Rickshaw Yojana : 'लाडकी बहिण'नंतर महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना, कुणाला मिळणार लाभ?

 17 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या निधी वितरणात  1 कोटी 7 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठवले होते. म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 59 लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये राज्य सरकारने टाकले आहेत. एखाद्या डेबीट योजनेतून 1 कोटी 59 लाख लाभार्थीना थेट लाभ त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातील सर्वात मोठी योजना असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT