Pink Rickshaw Yojana : 'लाडकी बहिण'नंतर महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना, कुणाला मिळणार लाभ?
Pink Rickshaw Yojana : लाडकी बहीण योजनेनंतर आता पिंक रिक्षा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील गरीब महिलांना मिळणार आहे. ज्या गरीब महिला आहेत, त्या महिलांना या पिंक रिक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे, असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज्यातील गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळणार
17 शहरात ही योजना राबवणार
त्या महिलांना ही पिंक रिक्षा मिळणार
Pink Rickshaw Yojana : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhymantri सध्या खूप चर्चेत आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा होत आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. या दरम्यान आता महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना देखील लागू होणार आहे. ही योजना नेमकी काय आहे? या योजनेचा फायदा कुणाला होणार आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme mahayuti government introduce for women pink rickshawa yojana what was the eligibility and condition)
लाडकी बहीण योजनेनंतर आता पिंक रिक्षा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील गरीब महिलांना मिळणार आहे. ज्या गरीब महिला आहेत, त्या महिलांना या पिंक रिक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे, असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली होती.
कुणाला मिळणार लाभ?
राज्यातील 17 शहरातील 10 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत.ज्या महिला गरीब आहेत, त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
महिलांना पिंक रिक्षा कशी मिळणार?
ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्या महिलांना ही पिंक रिक्षा मिळणार आहे. विशेष म्हणजे या पिंक रिक्षाची 20 टक्के रक्कम ही सरकार भरणार आहे. आणि 10 टक्के रक्कम ही अर्जदार महिलांना भरावी लागणार आहे. उरलेली 70 टक्के रक्कम बँकेच्या लोनच्या माध्यमातून भरावी लागणार आहे.
हे ही वाचा : Nandurbar Crime : आई, पोटात दुखतंय; डॉक्टरांकडे जाताच बापाचं पितळ उघडं पडलं, नेमकं काय घडलं?
कोण ठरणार पात्र?
ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत, त्या या योजनेस पात्र ठरणार आहेत. या महिलांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. आणि महाराष्ट्र रहिवासी पुरावाही आवश्यक आहे. तसेच या महिलांकडे आधार कार्ड, मोबईल नंबर, बँक खाते असणे गरजेचे आहे.
ADVERTISEMENT
कुठे अर्ज कराल?
खरं तर अद्याप सरकारकडून या योजनेची घोषणाच करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करायचे आहेत? याबाबत अधिक माहिती सरकारकडून देण्यात आली नाही आहे. मात्र लवकरच याबाबतची माहिती समोर येणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सरकारने घेतला मोठा निर्णय
ADVERTISEMENT