Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील 'इतक्या' महिलांचे अर्ज बाद, तुमचा नंबर आहे की नाही?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme these women application reject aditi tatkare ajit pawar eknath shinde mukhymantri ladki bahin yojana scheme
महिलांच्या खात्यात 3 हजार रूपये जमा होणार आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांच्या खात्यात 3 हजार रूपये जमा होणार

point

17 ते 19 ऑगस्ट दरम्यान पैसे जमा होणार

point

पण तुमचा अर्ज पात्र ठरला का?

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : अवघ्या काही दिवसातच लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 3 हजार रूपये जमा होणार आहेत. ही रक्कम साधारण 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. पण तत्पुर्वी अर्ज बाद ठरलेल्या महिलांचा आकडा समोर आला आहे. साधारण अंदाजे 11 लाख 45 हजार अर्ज बाद ठरल्याची शक्यता आहे.  आता या बाद ठरलेल्या अर्जात तुमचा नंबर नाही ना? हे नेमकं कसं तपासायचं आणि पात्रता यादी कशी तपासायची हे जाणून घेऊयात.  (ladki bahin yojana scheme these women application reject aditi tatkare ajit pawar eknath shinde mukhymantri ladki bahin yojana scheme) 

राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर ट्विट करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1 कोटी 45 लाख 76 हजार 091 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याची माहिती दिली आहे.  तसेच अर्जांची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरली आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या महिलांचा आकडा आणि पात्र उमेदवारांचा आकडा पाहता साधारण अंदाजे 11 लाख 45 हजार 235 अर्ज बाद ठरल्याची शक्यता आहे.  त्यामुळे या बाद ठरलेल्या अर्जात तुमचे नाव तर नाही हे कसे तपासायचे हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Raj Thackeray : '...तर ते मी खपवून घेणार नाही', ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला, राज ठाकरेंचा इशारा

तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जाचे स्टेटस नारीशक्ती दूत अॅपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारीशक्ती दूत अॅप मध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यामध्ये तुम्ही केलेले अर्ज दाखवण्यात येतील. आपल्याला ज्या अर्जाचे स्टेटस पहायचे आहे त्या अर्जावर क्लिक करा. आपल्या समोर आपल्या अर्जाची सद्य स्थिति पाहायला मिळेल. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्टेटसमधल्या 'या' पर्यायाचा अर्थ काय? 

Approved 

जर तुम्हाला अर्जात स्टेटस Approved असे दाखवत असेल तर अभिनंदन तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमीट झाला आहे. आता आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

Pending for Approval  

आपल्या अर्जात असा पर्यंत दाखवत असेल तर आपला अर्ज अजून तपासण्यात आला नाही आपल्याला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे आपला अर्ज लवकरच तपासण्यात येईल. 

ADVERTISEMENT

Edit and Resubmit

आपल्या अर्जात असा पर्याय दाखवत असल्यास आपण आपल्या अर्जातील त्रूटी काढणे आवश्यक आहे. आपल्या अर्जात जी त्रूटी दिली आहे ती त्रूटी काढून आपला अर्ज परत सबमीट करावा लागणार आहे. 

ADVERTISEMENT

Reject

जर आपल्या अर्जात वरील प्रमाणे म्हणजे REJECT हा  पर्याय दाखवत असेल तर आपल्याला आपला अर्ज का reject केला. या बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्या कारणास्तव आपला अर्ज रीजेक्ट करण्यात आलेला आहे.

हे ही वाचा : Anil Deshmukh: "वा... देवेंद्र फडणवीस जी! तुम्ही 15 दिवस का शांत होता?"

लाभार्थी यादी कशी तपासायची?

  • सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. 
  • अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
  • या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
  • तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
  • सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.
     

    follow whatsapp

    ADVERTISEMENT