Ram Mandir : कपाळी टिळा, रत्नजडित दागिने… रामलल्लाच्या अलौकिक श्रृंगाराचे वैशिष्ट्य काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली. यानंतर भक्तांना पहिल्यांदाच रामलल्लाच्या मूर्तीचं दर्शन झालं. दाक्षिणात्य पद्धतीने सजावट केलेली रामलल्लाची ही मूर्ती फारच सुंदर दिसत आहे. पंतप्रधान मोदींनीही रामलल्लाची मनोभावे पूजा केली.
ADVERTISEMENT

Ram Lalla Idol : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली. यानंतर भक्तांना पहिल्यांदाच रामलल्लाच्या मूर्तीचं दर्शन झालं. दाक्षिणात्य पद्धतीने सजावट केलेली रामलल्लाची ही मूर्ती फारच सुंदर दिसत आहे. पंतप्रधान मोदींनीही रामलल्लाची मनोभावे पूजा केली. (Ram Mandir Inaugration Ramlalla’s tilak jeweled gemstone ornaments What is the features and Importance About it )
आकर्षक दागिने, फुलांची आरास यामुळे रामलल्लाचं मनमोहक रुप पाहता क्षणी लध वेधून घेत होतं. रामलल्लाची 51 इंचाची मूर्ती विराजमान केल्यानंतर त्याच्या श्रृंगाराचे वर्णन केले जात आहे. रामलल्लाच्या बालरूपाची पूर्ण विधींसह प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर श्री राम मंदिर ट्रस्टने 16 दागिन्यांचे वर्णन केले आहे. रामलल्लाचे हे अलौकिक रूप पाहून भक्तांना आनंद आणि विस्मय होत आहे.
वाचा : PM मोदींचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन; म्हणाले, “त्यांच्या नेतृत्वामुळे…”
रामलल्लाच्या मूर्तीत काय आहे खास?
राम मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची काही खास वैशिष्ट्य आहेत. लोकांचे लक्ष विशेषतः रामलल्लाच्या टिळ्याने वेधले गेले जे खूप सुंदर आणि वेगळे दिसते. हा टिळा खास डायमंड आणि माणिक रत्नांपासून बनवण्यात आला आहे. जो खूप आकर्षक दिसतो. जर रामलल्लाच्या धनुष्यबाणाबद्दल बोलायचं झालं तर, ते सोन्याचे बनलेले आहे.
रामलल्ला मूर्तीच्या चौबाजूंनी आभाळमंडळ आहे. मूर्तीवर स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्यदेव आहेत. मोठे डोळे आणि भव्य कपाळ खूप आकर्षक आहे. तसंच भगवान विष्णूचे १० अवतारही मूर्तीत कोरण्यात आले आहेत. मूर्तीच्या खाली एका बाजूला रामाचे निस्सीम भक्त हनुमान आणि दुसऱ्या बाजूला गरुड देखील कोरलेले आहेत.