'तो' सेक्शुअल कंटेट पाहिलं की थेट तुरुंगात... काय आहे कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!

मुंबई तक

सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, चाइल्ड पॉर्न पाहणे किंवा ते संग्रहित करणे देखील गुन्ह्याच्या कक्षेत येते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

 चाइल्ड पॉर्न पाहणे किंवा ते स्टोअर हा देखील POCSO आणि IT कायद्यानुसार गुन्हा
चाइल्ड पॉर्न पाहणे किंवा ते स्टोअर हा देखील POCSO आणि IT कायद्यानुसार गुन्हा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चाइल्ड पोर्नोग्राफीवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

point

चाइल्ड पॉर्न पाहणं POCSO आणि IT कायद्यानुसार गुन्हा

point

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठाने दिला निर्णय

Sexual content verdict: नवी दिल्ली: चाइल्ड पोर्नोग्राफीवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, चाइल्ड पॉर्न पाहणे किंवा ते स्टोअर हा देखील POCSO आणि IT कायद्यानुसार गुन्हा आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. (supreme court child pornography verdict pocso act sexual content related to children can send you to jail in one click understand full decision of the supreme court)

मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहणे किंवा बाळगणे हे गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला अनेक स्वयंसेवी संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

हे ही वाचा>> धक्कादायक! कमी वयात पॉर्न पाहायची सवय, वर्गमित्राचाच सहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

या वर्षाच्या सुरुवातीला याच प्रकरणातील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने 'चाइल्ड पॉर्न पाहणे हा गुन्हा असू शकत नाही, पण पोर्नोग्राफीमध्ये लहान मुलाचा वापर करणे हा गुन्हा आहे', अशी टिप्पणी केली होती.

आता सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा तो निर्णय रद्द केला आहे. सुप्रीम कोर्टाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय 'गंभीर चूक' असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp