Kitchen Tips : नारळ सोलून वैतागलात? 'या' सोप्या ट्रिक्सने खोबरं येईल झटपट बाहेर अन् वेळंही वाचेल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Easy Tips To Remove Coconut Shell
Easy Tips To Remove Coconut Shell
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नारळाचे फायदे माहितीयत का?

point

नारळ सोलण्याच्या 'या' आहेत सोप्या ट्रिक्स

point

'या' ट्रिक्समुळे नारळ सोलण्यात लागेल खूपच कमी वेळ

Easy Tips To Remove Coconut Shell : नारळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसच नारळाची चवही अनेक लोकांना पसंत येते. म्हणून लोकांना नारळापासून अनेक डिश बनवणं पसंत आहे. येत्या काही दिवसात दिवाळीचा सण उत्सव सुरु होणार आहे. अनेक गोड पदार्थांमध्ये नारळाच्या खोबऱ्याचा वापर केला जातो. परंतु, नारळाबाबत लोकांना एक समस्या नेहमी जाणवते. नारळ फोडता फोडता अनेकांना घाम फुटतो, म्हणजेच नारळ सोलण्याची सोपी पद्धत माहित नसल्याने अनेक जण गोंधळात पडतात. 

नारळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पण नारळ सोलण्याच्या समस्येमुळं अनेकांच्या नाकी नऊ येतं. नारळ फोडून झाल्यावर त्यात असलेला खोबरा व्यवस्थित काढण्यासाठी खूप वेळ लागतो. तसच नारळाची कवटी काढणंही खूप कठीण असतं. जर तुम्हीही या समस्यांचा सामना करत असाल, तर आम्ही दिलेल्या सोप्या ट्रिक्सचा वापर करून नारळ सोलण्याची समस्या दूर करू शकता. आम्ही तुम्हाला यासाठी खूप सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. या ट्रिक्स फॉलो केल्यानंतर तुम्ही नारळाची कवटी सहज बाहेर काढू शकता. 

हे ही वाचा >>  devendra fadnavis Property: देवेंद्र फडणवीसांची संपत्ती आली समोर, किती माहितीए?

स्टेप नंबर 1

सर्वात आधी हाताने नारळाच्या छिलक्यांना बाहेर काढा. जर छिलके सहजपणे निघाले नाहीत, तर तुम्ही नारळाला गॅसच्या मीडियम फ्लेमवर थोड्या वेळासाठी गरम करू शकता. यामुळे नारळाचे छिलके वेगळे होण्यास मदत होईल. यानंतर एखाद्या स्वच्छ कपड्यांच्या मदतीने नारळाल साफ करा. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्टेप नंबर 2 

नारळाचे छिलके वेगळे झाल्यानंतर मजबूत वस्तुने नारळाला तोडून घ्या.

हे ही वाचा >> Ladki Bahin Scheme : 'लाडकी बहीण'विरोधातील याचिकाकर्त्याने मागितली सुरक्षा, म्हणाला माझ्या जीवाला...

स्टेप नंबर 3

आता, एक वाटीभर पाणी गरम करत ठेवा. पाणी उकळल्यानंतर यामध्ये नारळाला दोन-तीन मिनिटांसाठी ठेवा. असं केल्याने नारळाची कवटी वेगळी होते. पाण्यातून नारळाला बाहेर काढा आणि चाकूच्या मदतीने नारळाच्या कवटील वेगळं करा. या तीन टीप्स फॉलो केल्यानंतर खूप सोप्या पद्धतीने नारळाच्या कवटीला वेगळं करू शकता.  

ADVERTISEMENT

टीप - नारळ सोलण्याच्या ट्रिक्सबाबत सांगितलेली माहिती सूत्रांच्या आधारावर दिली आहे. मुंबई तर या माहितीची पुष्टी करत नाही. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT