Berlin Wall History : एका रात्रीत बांधलेली बर्लिनची जगप्रसिद्ध भिंत का पाडली?
आज बर्लिनच्या प्रसिद्ध भिंतीची गोष्ट जाणून घेऊयात. बर्लिनची भिंत का बांधली गेली? जर्मनीची फाळणी कशी झाली आणि एका छोट्याशा चुकीमुळे ही भिंत कशी पडली? या कहाणीची सुरूवात 1945 पासून सुरू झाली.
ADVERTISEMENT

History of Germany And Berlin Wall : आइडा सीकमॅन नावाची 59 वर्षीय महिला नर्स म्हणून काम करत होती. ती अगदी सामान्य जीवन जगत होती. मग एक दिवस असा आला जेव्हा एका रात्री सीकमॅनला जाग आली आणि सर्व काही बदललं होतं. सीकमॅनचं घर फाळणीतील उंबरठा बनलं होतं. सीकमॅन ज्या इमारतीत राहत होती ती एका देशात होती आणि त्याचं दार दुसऱ्या देशात उघडत होतं. जरी ही व्यवस्था नवीन नव्हती पण, देशाच्या राज्यकर्त्यांनी भिंत बांधण्याची घोषणा केली होती, हे नवीन होतं. याचं कारण म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूला कोणीही जाऊ शकणार नाही. (World Famous Berlin Wall History How and why did fall)
सीकमॅनचं घर अगदी बॉर्डरच्या मध्यभागी होतं. त्यामुळे त्याचे दरवाजे सील करण्यात आले होते. पलीकडे जाण्यासाठी लोक काहीही करायला तयार होते. मग एक मार्ग सापडला. काही लोक इमारतीखाली चादर पसरवून उभे राहू लागते. ज्यात उडी मारून लोक दुसऱ्या बाजूला जाऊ शकत होते. सीकमॅनचे घर चौथ्या मजल्यावर होते. उडी मारणे कठीण होते. यात तिचं वयही खूप होतं. तिने तीन दिवस वाट पाहिली. पण नंतर ती जास्त थांबू शकली नाही. पलीकडे जाण्याच्या धडपडीत तिने आपले सामान खिडकीतून फेकून दिले आणि नंतर स्वतः उडी मारली. चादर पसरवली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सीकमॅनचे डोके जमिनीवर आपटले आणि तिचा मृत्यू झाला.
लोकसभा 2024 निवडणुकीपूर्वीच BJP ला दक्षिणेत झटका! AIADMK ची मोठी घोषणा
बर्लिनच्या भिंतीमुळे पडून मरण पावलेली पहिली व्यक्ती इडा सीकमॅन होती. येत्या काही वर्षांत, ही भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करताना 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आज याच बर्लिनच्या प्रसिद्ध भिंतीची गोष्ट जाणून घेऊयात. बर्लिनची भिंत का बांधली गेली? जर्मनीची फाळणी कशी झाली आणि एका छोट्याशा चुकीमुळे ही भिंत कशी पडली?
जर्मनीची फाळणी