Viral Video: पैसाच पैसा! MOMO विकणारे प्रत्येक महिन्याला किती कमवतात? आकडा वाचून थक्कच व्हाल
Momo Seller Viral Video : हेल्दी फूडचं सेवन करणं सर्वांनाच आवडतं. पण अनेक लोक स्ट्रीट फूडमध्ये 'मोमो'ला खूप पसंती दर्शवतात. दिवसेंदिवस मोमो खाण्याची क्रेझही वाढताना दिसत आहे
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मोमो विक्रेत्याचा महिन्याची कमाई वाचून डोकंच धराल

मोमो विक्रेत्याच्या स्टॉलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले
Momo Seller Viral Video : हेल्दी फूडचं सेवन करणं सर्वांनाच आवडतं. पण अनेक लोक स्ट्रीट फूडमध्ये 'मोमो'ला खूप पसंती दर्शवतात. दिवसेंदिवस मोमो खाण्याची क्रेझही वाढताना दिसत आहे. पण जे लोक मोमो खातात, त्यांना मोमो विकणाऱ्यांची कमाई माहितीय का? या प्रश्नाचं उत्तर वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण मोमो विकणाऱ्या तरुणाचा एक जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रस्त्यावर मोमोची गाडी लावण्याऱ्या विक्रेत्यांचं महिन्याचं उत्पन्न किती आहे, याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत.
खरंतर मोमो विकणारे एक दिवसात किती रुपये कमवतात? याची माहिती घेण्यासाठी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने एका दिवसासाठी मोमोचा ठेला लावला. त्यानंतर मोमो विकून जे पैसे मिळाले, ते पाहून त्या तरुणालाही धक्काच बसला. मोमो विकणाऱ्याची एका महिन्याची कमाई या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली, ते पाहून लोकांच्याही भुवया उंचावल्या.
हे ही वाचा >> Salman Khan: सलमान खानसह मुंबईच्या 'या' आमदाराला जीवे मारण्याची पुन्हा धमकी, यामागे कुणाचा हात?
सोशल मीडिया इन्ल्फुएन्सरच्या या व्हिडीओला 1 कोटींहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओत पाहू शकता की, तरुण मुलं ठेला लावून मोमो विक्री करत आहे. सर्वात आधी त्यांनी मोमो बनवण्याची पद्धत शिकून घेतली. त्यानंतर मोमो विकायला सुरुवात केली. मोमो शिजल्यानंतर खवय्यांची एकप्रकारे लाईनच लागल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. 90 मिनिटातच जवळपास 55 प्लेट विकले गेले आहेत, असं ते व्हिडीओत सांगत आहेत. मोमो खाण्याऱ्यांची गर्दी वाढल्याने संध्याकाळपर्यंत मोमो 121 प्लेट आणि तंदुरी मोमो 60 ते 70 प्लेट विकले गेले.