Samudrayaan : चंद्र-सूर्यानंतर आता समुद्र.. कोणालाही जमलं नाही ते आता भारत करणार?

रोहिणी ठोंबरे

चांद्रयान-3 चंद्रावर उतरवल्यानंतर आणि सूर्याचे रहस्य शोधण्यासाठी आदित्य एल-1 पाठवल्यानंतर आता भारतीय शास्त्रज्ञांनी महासागराची खोली मोजण्याची तयारी केली आहे. भारत आपली पहिली मानवयुक्त सागरी मोहीम पाठवण्याच्या तयारीत आहे, ज्याला समुद्रयान असे नाव देण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Samudrayan Mission : चांद्रयान-3 चंद्रावर उतरवल्यानंतर आणि सूर्याचे रहस्य शोधण्यासाठी आदित्य एल-1 पाठवल्यानंतर आता भारतीय शास्त्रज्ञांनी महासागराची खोली मोजण्याची तयारी केली आहे. भारत आपली पहिली मानवयुक्त सागरी मोहीम पाठवण्याच्या तयारीत आहे, ज्याला समुद्रयान असे नाव देण्यात आले आहे. (Why Samudrayan Mission is important for India)

समुद्रयान मिशन आहे तरी काय?

समुद्रयान मिशन ही भारताची महत्वाकांक्षी सागरी मोहीम आहे. याद्वारे भारत खोल समुद्रात सापडणारे खनिजे आणि जलचरांचा अभ्यास करणार आहे. समुद्रयान प्रकल्पांतर्गत, खोल समुद्रात 6,000 मीटर खोलीपर्यंत तीन लोकांना यशस्वीरित्या नेण्याची योजना आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये चेन्नईत भारताचे पहिले मानवयुक्त समुद्र मोहीम समुद्रयानचा शुभारंभ करण्यात आला होता. समुद्रयान हे केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने सुरू केलेले स्वदेशी सागरी अभियान आहे.

Maratha Reservation : ‘भिडे गुरूजी सरकारचा सांगकाम्या…’, विजय वड्डेटीवार भडकले

या संपूर्ण समुद्रयान प्रकल्पासाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात बसवलेल्या सबमर्सिबलला मत्स्य-6000 असे नाव देण्यात आले असून ते टायटॅनियम धातूपासून बनलेले आहे. त्याचा व्यास 2.1 मीटर आहे. हे वाहन तीन लोकांना समुद्राच्या खोलवर नेण्यास सक्षम आहे. हे सबमर्सिबल 6000 मीटर खोलीवर समुद्रसपाटीच्या दाबापेक्षा 600 पट जास्त म्हणजे 600 बार (दाब मोजण्याचे एकक) प्रेशर सहन करू शकते.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू या मोहिमेबद्दल काय म्हणाले?

मत्स्य-6000 चे फोटो शेअर करताना केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, ‘चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीमध्ये त्याचे बांधकाम केले जात आहे. समुद्रयानमधील खोल समुद्र संसाधनांचा अभ्यास करण्याच्या योजनेमुळे सागरी परिसंस्थेला त्रास होणार नाही. ही योजना पंतप्रधानांच्या ब्लू इकॉनॉमी धोरणाला पाठिंबा देते.’

हे वाचलं का?

    follow whatsapp