Mahayuti meeting Delhi : कुणाला मंत्रिपदं, कोण मुख्यमंत्री ते शपथविधीची तारीख... अमित शाहांच्या घरी काय चर्चा? काय ठरलं?

मुंबई तक

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटू शकलेला नाही. याचसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या घरी  बैठक आजोयित करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दिल्लीत अमित शाहांच्या घरी झालेल्या बैठकीत काय ठरलं?

point

राज्यात कुणाला मिळणार सर्वात जास्त मंत्रिपदं?

point

शपथविधीच्या तारखेवर चर्चा झाल्याची माहिती

दिल्लीत काल महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटू शकलेला नाही. याचसाठी ही  बैठक आजोयित करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्यामुळे आता आज मोठी घोषणा होणार का यावर सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, या बैठकीनंतर काही बोलके फोटो देखील समोर आले आहे. यामध्ये काही गोष्टी अत्यंत स्पष्ट दिसत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबद्दलची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

हे ही वाचा >> Maharashtra CM: फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य, एकनाथ शिंदे मात्र... 'त्या' फोटोने सगळंच केलं क्लिअर?

अमित शाह यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याची माहिती आहे. यामध्ये कुणाला किती खाती मिळणार यावर चर्चा झाली. मात्र कोणती खाती मिळणार यावर चर्चा न झाल्याची माहिती आहे. त्यानुसार सर्वात जास्त म्हणजे जवळपास 20 खाती भाजपकडे असू शकतात, तर त्याखालोखाल खाती शिंदेंकडे असतील. तसंच सर्वात कमी खाती अजित पवार यांच्या पदरात पडणार आहेत. मात्र केंद्रीय मंत्रिपदावरुनही सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. 

 

हे ही वाचा >> 'पवार साहेब कायमस्वरुपी घरी बसा, अनेक लोकांचं वाटोळं केलंय', भाजपच्या बड्या नेत्याकडून हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार अशी शक्यता आहे. मात्र, ऐनवेळी भाजप हायकमांड धक्का देणार का? यावर आता सर्वांची नजर आहे. दरम्यान या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे राज्यात परत येणार आहेत. त्यामुळे आता हे नेते महाराष्ट्रात आल्यानंतर काय बोलणार यावर सर्वांचं लक्ष आहे. तसंच दुसरीकडे या सरकारचा शपथविधी येणाऱ्या 2 किंवा 5 डिसेंबरला होईल अशी शक्यता आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp