Eknath Shinde Press conference : 'मी मोदी-शाहांना फोन केला...',मुख्यमंत्री पदाबाबत शिंदेंकडून प्रचंड मोठा निर्णय
Eknath Shinde Press Conference live : भाजपचे पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देतीय, अशी तुफान चर्चा रंगलीय. अशातच एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री?

एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत केली मोठी घोषणा

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Eknath Shinde Press Conference live : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलंय. भाजपचे पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देतील, अशी तुफान चर्चा रंगलीय. अशातच एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. यावेळी शिंदे म्हणाले, "मी स्वत: काल पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता. त्यांना फोन करून सांगितलं की, सरकार बनवताना निर्णय घेताना... कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा इतर कुणामुळे हे अजिबात मनात आणू नका.
तुम्ही आम्हाला मदत केलेली, तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली. जनतेचा विकास करण्यासाठी संधी दिली. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या.. तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भाजपसाठी अंतिम असतो तसाच आम्हालाही अंतिम आहे. त्यामुळे निर्णय घेताना तुम्ही असं वाटून नका घेऊ की, माझी अडचण आहे का. तर बिलकुल नाही.. त्यामुळे मी काल मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना फोन केला.. माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या. तुम्ही सरकार बनवताना मनात काही ठेवू नका.. तुम्ही सरकार बनवताना जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या. तो मला मान्य असेल.
शिंदे पुढे म्हणाले, कुठलीही कोंडी राहू नये यासाठी मी तुम्हाला बोलावलं आहे. भाजपचं वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल मुख्यमंत्री बनविण्यासाठी.. त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, पाठिंबा आहे. मी कालच त्यांना सांगितलं आहे की, जो निर्णय तुम्ही घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे. त्यामुळे कुठलीही कोंडी, अडसर नाराजी असं काही नाही. म्हणून जो निर्णय मोदी-शाह साहेब घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल, असंही शिंदे म्हणाले.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: महिलांनो! 'या' महिन्यात मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 6 व्या हफ्त्याचे 1500?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला?
लोकांची भावना साहजिक आहे.. मला मुख्यमंत्री करण्याचे.. हा त्यांचा मोठेपणा आहे. मी जे निर्णय घेतले ते त्यांना माहिती आहे.आम्ही महायुतीचे लोकं आहोत. आम्हाला त्यांनी अडीच वर्ष पाठिंबा दिला होता ना.. आता भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याला आणि त्यांच्या उमेदवाराला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असंही मोठं विधान शिंदेंनी केलं.