Shiv Sena UBT Candidates List: ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, कुणाकुणाला मिळाली संधी?
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना (UBT) पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी तीन उमेदवारांना संधी दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ठाकरेंचे शिवसेनेचे शिलेदार ठरले, तिसरी यादी आली समोर

विधानसभा निवडणुकीत ठाकरे किती जागा लढवणार?

ठाकरेंनी कोणाकोणाला दिली उमेदवारी?
Maharashtra Assembly Election 2024 Shiv Sena (UBT) Third Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी शिवसेना (UBT) पक्षाने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीत ठाकरेंनी फत्त 3 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ठाकरेंनी 83 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. maharashtra assembly election 2024 constituency wise shiv sena ubt third list candidates announce uddhav thackeray mva
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी काही वेळापुर्वी पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरेंनी दुसरी यादी जाहीर केली होती, या यादीत 15 नावांचा समावेश होता. आणि आता ठाकरेंनी तिसरी यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये फक्त तीन नावाचा समावेश आहे. हे तीन उमेदवार कोण आहेत? ते पाहूयात.
पाहा शिवसेना (UBT) पक्षाची तिसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena (UBT) 3rd Candidates List)
१६४ वर्सोवा - हरुन खान
१६९ घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव
१६७ विलेपार्ले - संदिप नाईक
हे ही वाचा : Congress Candidates 2nd List: काँग्रेसची दुसरी यादी आली समोर, MVA मध्ये नवं राजकारण?
महाविकास आघाडीने आधी 85-85-85 चा फॉर्म्युला सांगितेला आणि 18 जागा या मित्रपक्षांना सोडणार होते. त्यामुळे आणखी 15 जागा उरत होत्या. ज्या प्रत्येकी पाच वाटल्या जाणार होत्या. त्यानुसार महाविकास आघाडी प्रत्येकी 90 जागांवर लढणार आहे. ठाकरेंनी आता फक्त 83 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. आता ठाकरे आणखी 7 जागांवर कोणते उमेदवार जाहीर करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.