Ajit Pawar: 'पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन...', अजितदादा खोतांवर प्रचंड संतापले!
Ajit Pawar on Sadabhau Khot: आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जी अशोभनीय टीका केली त्यावरून आता अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जहरी टीका
अजित पवारांनी केला संताप व्यक्त
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अनेक नेते सदाभाऊ खोतांवर संतापले
Ajit Pawar angry on Sadabhau Khot: मुंबई: ''पवारसाहेबांना मानावं लागेल, कारण ते म्हणतायत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?" अशा प्रकारची अशोभनीय टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच केली. ज्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचंड संतापले आहेत. (maharashtra assembly election 2024 ncp will not tolerate any personal criticism of pawar saheb at a low level ajit pawar was very angry with sadabhau khot)
ADVERTISEMENT
सदाभाऊ खोत यांनी अशाप्रकारची टीका केल्यानंतर अजित पवार यांनी एक्स (ट्विटर) वर ट्विट करून या वक्तव्याचा निषेध केला आहे.
हे ही वाचा>> Sadabhau Khot: 'पवार तुमच्या चेहऱ्यासाखा महाराष्ट्र हवा का?', फडणवीसांसमोरच सदाभाऊ खोत बरळले!
सांगलीच्या जतमध्ये आज (6 नोव्हेंबर) गोपीचंद पडळकर यांच्यासाठी महायुतीची सभा पार पडली. या सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरुन टीका केली. ज्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी सदाभाऊंवर टीकेची झोड उठवली.
हे वाचलं का?
'हे खपवून घेणार नाही', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही.' अशा शब्दात अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांना सुनावलं
दुसरीकडे दिलीप वळसे-पाटील यांनीही सदाभाऊंना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून खडे बोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
'ज्येष्ठ नेते आमचे सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय शरद पवार साहेबांविषयी सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या थराला जाऊन घृणास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी असून, अतिशय संतापजनक वक्तव्य आहे.'
ADVERTISEMENT
'या संपूर्ण प्रकारचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो आणि अशा प्रकारची वक्तव्ये आम्ही कदापीही खपवून घेणार नाही. तसेच या प्रकारची वक्तव्ये सर्वांनी टाळावीत व एक तारतम्य आणि भान बाळगून प्रचार करावा.' असा सल्लाच वळसे-पाटलांनी यावेळी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.
सदाभाऊ खोत शरद पवारांबाबत नेमकं काय म्हणाले?
'देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागलेत माहिती आहे का? आपल्या घरात गाय असते तशी राज्याची तिजोरी आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे लोक घेरतायत, कारण देवेंद्र फडणवीस म्हणत होते गायीचं सगळं दूध वासरांचं आहे, मी सगळं दूध वासरांना देणार.'
हे ही वाचा>> Raj Thackeray: 'माझा हातात सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा...', राज ठाकरेंनी ऐन निवडणुकीत पुन्हा...
'मग पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या, ते म्हटले माझ्या चिल्यापिल्यांचं कसं व्हायचं... पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या... पण तरी पवारसाहेबांना मानावं लागेल, कारण ते म्हणतायत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?' असं वादग्रस्त विधान सदाभाऊ खोत यांनी यावेळी केलं. ज्यावरून आता वादाला तोंड फुटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT