Maharashtra Election Results : विधानसभेच्या निकालात खरंच गोंधळ? तुमचे प्रश्न, निवडणूक आयोगाची सविस्तर उत्तरं...
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी इव्हीएमवर आक्षेप घेत, गैरप्रकार झाल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी काही मतदारसंघांमधील आकडेवारी शेअर करत प्रश्न उपस्थित केले होते. अशाच प्रश्नांची उत्तर निवडणूक आयोगाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न 'मुंबई तक'च्या माध्यमातून करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मतदानाच्या आकडेवारीमध्ये घोळ कसा?

विजयी किंवा पराभूत उमेदवारांच्या मतांमध्ये साम्य कसं?

मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी Exclusive
Maharashtra Assembly Elections Results 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणी दरम्यान अनेक ठिकाणी घोळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहेत. संजय राऊत यांनी इव्हीएमवर आक्षेप घेत, फेरफार झाल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी काही मतदारसंघांमधील आकडेवारी शेअर करत प्रश्न उपस्थित केले होते. हा गोंधळ नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आणि विरोधकांनी मांडलेल्या आकड्यांच्या गणिताची उकल करण्यासाठी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याशी 'मुंबई तक'चे संपादक साहिल जोशी यांनी संवाद साधला. यामध्ये सर्व आरोपांवर, शंकांवर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा, प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
1. विजयी किंवा पराभूत उमेदवारांच्या मतांच्या आकड्यात साम्य कसं?
विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार राज्यातील अनेक ठिकाणी विजयी किंवा पराभूत उमेदवारांच्या मतांच्या आकड्यांमध्ये साम्य आढळून येतं. यावर बोलताना किरण कुलकर्णी यांनी सांगितलं की, आम्ही प्रक्रियेबद्दल नक्की स्पष्टीकरण देत असतो. नाशिकमध्ये असे अनेक प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं, तेव्हा आम्ही नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही संपर्क केला, कारण ते निवडणूक अधिकारी हे तिथले जिल्हाधिकारी असतात. आकडेवारी पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की, प्रत्येक मतदारसंघात मिळालेली मतांची संख्या वेगवेगळीच आहे. फक्त रेंज सारखी म्हणत असाल, तर तो स्टॅस्टीक अॅनालिटिक्सचा भाग आहे. पुढे बोलताना किरण कुलकर्णी यांनी सांगितलं की, प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची संख्या वेगळीच असते. पण ती एका रेंजमध्ये दिसते, मात्र आकडेवारी वेगळीच असते. पण रेंज सारखी असणं स्वाभाविक आहे, याचं कारण म्हणजे 2008 मध्ये 'डिलिमिटेशन ऑफ कॉन्सिट्युएन्सीज्' झालं, तेव्हा मतदारसंघांची निश्चिती करण्यात आली. मतदानाची टक्केवारी पाहिली तरी रेंज सारखीच असल्याचं प्रत्येक निवडणुकीत दिसतं. पण आकडेवारी वेगळी आहे. एकूणच बूथनिहाय विचार केल्यास आकडे वेगळे आहेत असं त्यांनी सांगितलं.