Vidhansabha Election 2024: 'मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेक लोक...', राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य!
राज-उद्धव वाद निवडणुकीच्या तोंडावर विकोपाला जाण्याची शक्यता गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींमुळे वाटत होतं. मात्र एका मुलाखतीत राज ठाकरेंनी एक सकारात्म पाऊल टाकण्याची तयारी दाखवल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंशी चर्चा होणार का?

दोन्ही भावांमध्ये दुरावा का?
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातले वाद समोर येताना दिसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावरही वारंवार दोन्ही भाऊ एकमेकांवर टीका करत आहेत. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. अमित ठाकरे हे सध्या निवडणुकीच्या मैदानात असून उद्धव ठाकरेंनी मात्र आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. राज ठाकरे वारंवार हा मुद्दा बोलून दाखवतात. तर 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता हा वाद आणखी विकोपाला जाणार का अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत राज ठाकरेंनीही या वादाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.
हे ही वाचा >>Uddhav Thackeray : "वडिलांना झालेल्या वेदना मी...", रक्ताच्या नात्याबद्दल उद्धव ठाकरे सविस्तर बोलले
राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यासाठी प्रस्ताव देण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो उद्धव ठाकरेंनीच फेटाळला अशी चर्चा नेहमी होते. मात्र आता राज ठाकरेंनी पुन्हा एकदा एका मुलाखतीत सकारात्मक भूमिका मांडल्याचं दिसतंय. राज ठाकरे यांनी या वादावर लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भूमिका अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक तसंच मराठी माणूस व्यक्त करत असतो. याबद्दल राज ठाकरे विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही एकत्र येऊ नये यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. त्यामध्ये आतलेही आहेत आणि बाहेरचेही. मात्र मी अलर्ट असतो. एकत्र येण्याचा विषय एकट्याच्या इच्छेचा नाही. एकत्र यायचं असेल तर त्यासाठी चर्चा होणं गरजेचं आहे. चर्चा होत नसेल तर बोलण्याला काय अर्थ आहे असं राज ठाकरे म्हणाले.